Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता ब्रह्म मिश्राच्या रहस्यमय मृत्यूनंतर त्याचा अखेरचा व्हिडीओ वायरल; चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मांझी, मिर्झापूर २ आणि केसरी यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये अव्वल भूमिका साकारणारा अभिनेता ब्रह्म मिश्रा याच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना आणि बॉलिवूडकरांना मोठा धक्का लागला आहे. आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मनं जिंकणा-या ब्रह्म मिश्राचा मृत्यू एक गूढ निर्माण करणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील वर्सोवा येथील अभिनेत्याच्या राहत्या घरी त्याचा मृतदेह अगदीच अर्धवट कुजलेल्या अवस्थेत बाथरूमध्ये आढळून आला. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असला तरीही मृत्यूमागील कारण अद्याप उघड झालेले नाही. यानंतर आता ब्रह्म मिश्राचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bramha Mishra (@bramhaamishra)

अभिनेता ब्रह्म मिश्राच्या अकाली मृत्यूचे कारण अजूनही समोर आलेले नसल्यामुळे हा मृत्यू नैसर्गिक होता का यामागे काही वेगळे कारण दडले आहे असा एक प्रश्न निर्माण झाला आहे. यानंतर अभिनेत्याचा अखेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून ब्रह्मचे चाहते अक्षरशः भावुक झाले आहेत. तर बॉलिवूडकरसुद्धा हळहळले आहेत. या व्हिडीओत ब्रह्म मिश्रा आपल्या एका मित्रासोबत In Da Ghetto वर डान्स करताना दिसतोय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच वायरल होतोय. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ब्रह्मचे चाहते त्याच्या अकाली मृत्यूबाबत शोक व्यक्त करत आहेत.

माहितीनुसार, अभिनेता ब्रह्म मिश्रा वर्सोवा येथील यारीरोड परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होते. त्यांच्या राहत्या फ्लॅटमधील बाथरूमध्ये त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. ब्रह्मच्या खोलीतून दुर्गंध येत असल्याने शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती संबंधित विभागातील पोलिसांना दिली. पोलिसांनी खोलीचे दार उघडून पाहिले असता बाथरूमध्ये अभिनेत्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. अभिनेता बाथरूमला गेला असताना त्याचा मृत्यू झाला असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यानंतर ब्रह्म यांचा मृतदेह ठाण्यातील कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वर्सोवा पोलीस करत आहेत.