Take a fresh look at your lifestyle.

‘या’ अभिनेत्रीवर बसला होता ‘कॉलगर्ल’चा शिक्का… !

0

चंदेरी दुनिया । बॉलिवूड स्टार कल्की कोचलीन सध्या 8 महिन्यांची प्रेग्नंट आहे. सध्या ती इजरायली कंपोजर, टीचर आणि पियानिस्ट असणाऱ्या गाय हर्शबर्गला डेट करत आहे. त्याच्याच बाळाची ती आई होणार आहे. अद्याप त्यांनी लग्न केलेलं नाही. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कल्कीनं काही गोष्टींचा खुलासा केला आहे. एक वेळ अशी होती लोक तिला कॉलगर्ल म्हणून चिडवायचे असं तिनं सांगितलं आहे.

कल्की म्हणाली, ‘देव डी सिनेमात मी वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. सिनेमात ती खरंच देहविक्री करतेय असंच लोकांना वाटू लागलं. त्यामुळे तिची कॉलगर्ल अशी इमेज झाली होती. मी जिथे जायची लोक मला रशियन कॉलगर्ल म्हणून चिडवायचे. या सिनेमामुळं आणि कॉलगर्ल इमेजमुळे मला बाहेर पडणंही मुश्किल झालं होतं.’

पुढे बोलताना ती म्हणाली, ‘आम्हाला लग्न करण्यात काहीही अडचण नाही. परंतु केवळ लग्नाआधी मी प्रेग्नंट आहे म्हणून आम्हाला लग्न करायचं नाही. आमच्या मुलाच्या शाळेसाठी किंवा कागदपत्रांसाठी गरज असल्यास आम्ही लग्नाबद्दल विचार करू. परंतु तूर्तास आम्ही एकमेकांशी, आमच्या प्रेमाशी वचनबद्ध आहोत. कुटुंबाशीही प्रामाणिक आहोत.’

2009 साली देव डी सिनेमाच्या सेटवर कल्की अनुराग कश्यप यांच्या प्रेमात पडली होती. 2011 साली कल्कीनं फिल्ममेकर अनुराग कश्यप सोबत 2 वर्ष डेट केल्यानंतर लग्न केलं होतं. पंरतु 2015 साली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही चांगले मित्र आहेत. कल्कीला घटस्फोट दिल्यानंतर अनुराग 21 वर्षांनी लहान शुभ्रा शेट्टीच्या प्रेमात पडले.

कल्कीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी आलेल्या नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स या वेब सीरीजमध्ये ती दिसली होती. रणवीरच्या गली बॉय या सिनेमातही तिनं काम केलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: