Take a fresh look at your lifestyle.

‘ब्लॅक पॅथर’ चॅडविक बॉसमनच्या शेवटच्या ट्विटने केला विक्रम ; मिळाले सर्वाधिक लाईक्स

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | ‘ब्लॅक पॅथर’ फेम अभिनेता चॅडविक बॉसमन याचे गेल्या आठवड्यात वयाच्या ४३ व्या वर्षी निधन झाले. चॅडविक बॉसमन मागील ४ वर्षांपासून कॅन्सर या रोगाविरोधात लढा देत होता. त्याच्या निधनानंतर जगभरातील चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. चॅडविकने भले जगाचा निरोप घेतला पण त्याने जाता जाता देखील इतिहास रचला आहे. ट्विटरच्या इतिहासातील त्याच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेले शेवटचे ट्विट सर्वाधिक लाईक मिळवणारे ट्विट ठरले आहे.

ट्विटरने आपल्या अधिकृत हँडलवरुन ट्विट करत ही माहिती दिली आहे. आतापर्यंत 73 लाखांपेक्षा अधिक लाईक्स चॅडविकच्या या ट्विटला मिळाले आहेत. तसेच यावर 24 लाखांहून अधिक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर 31 लाखांपेक्षा अधिक वेळा हे ट्विट रिट्विट केले गेले.

चॅडविकचा एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो इतिहासातील सर्वाधिक लाईक मिळवणा-या या ट्विटमध्ये आहे. त्यासोबत एक संदेश आहे. ज्यात त्याच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. चॅडविकला 2016 मध्ये तिस-या स्टेजचा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते, अशी माहितीही या संदेशात देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’