Take a fresh look at your lifestyle.

हॉलिवूड ची प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पीयर्सने शेअर केला तिचा पाय मोडल्याचा व्हिडिओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । हॉलिवूड ची प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पीयर्सने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा पाय मोडल्याची घटना स्पष्टपणे दिसून येते. अभिनेत्रीने स्टुडिओच्या आत असलेली क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘बेबी वन मोर टाइम’ ची हिटमेकर पिवळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स घातलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती नाचताना दिसत आहे.

शोबीझच्या वृत्तानुसार, व्हिडिओ संपण्यापूर्वी ब्रिटनी नाचत असताना पाय पकडून एकदम खालीच बसते.

 

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “मी सहा महिन्यांपासून नाचले नाही, मला या जागेची आता भीती वाटते.”