Take a fresh look at your lifestyle.

‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या अभिनेत्रीला कोरोनाची लागण,सोशल मीडियावर दिली पुष्टी

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । लोकप्रिय टीव्ही सीरियल ‘गेम ऑफ थ्रोन्स’ स्टार इंदिरा वर्मा कोरोना विषाणूची शिकार झाली आहे. याची माहिती तिने स्वत:च सोशल मीडियावर दिली आहे.दोन दिवसांपूर्वी याच शोचा अभिनेता क्रिस्तोफर हिवजूलाही कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली होती.

इंदिरा वर्मा हिने इन्स्टाग्रामवर कोरोना विषाणूने ग्रस्त असल्याची माहिती देताना लिहिले की, ‘मी पलंगावर आहे आणि माझी तब्येत ठीक आहे. सुरक्षित रहा आणि निरोगी रहा. आपल्याबरोबरच लोकांचीही काळजी घ्या. ‘

 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जवळजवळ सर्व देशांमध्ये पसरला आहे. भारतातील रूग्णांची संख्या १७० च्या पुढे गेली आहे, तर ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार खबरदारी म्हणून अनेक पावले उचलत आहेत, त्याअंतर्गत शाळा, महाविद्यालये, जिम, मॉल आणि थिएटर बंद केली गेली आहेत. गाड्या रद्द केल्या जात असून लोकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले जात आहे.

 

Comments are closed.