Take a fresh look at your lifestyle.

कोरोना विषाणूमुळे ‘पीटर रॅबिट २: द रनवे’ च्या रिलीज ची तारीख पुढे ढकलली

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । जगातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ‘पीटर रॅबिट २: द रनवे’ चित्रपटाचे रिलीज ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. एसेशोबिज डॉट कॉमच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये बनलेल्या या अत्यंत यशस्वी प्रकल्पाचा पाठपुरावा सोनी अधिकाऱ्यांनी चार महिन्यांपेक्षा जास्त काळ तहकूब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हॉलिवूड रिपोर्टरच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट २७ मार्च रोजी रिलीज होणार नाही, त्याऐवजी ७ ऑगस्ट रोजी हा चित्रपट अमेरिकेसह जगभरात प्रदर्शित होईल.
अलीकडेच जेम्स बाँडचा ‘नो टाइम टू डाय’ हा सिनेमा रिलीजसाठी नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता त्याच्या नंतर हा निर्णय घेण्यात आला.
‘पीटर रॅबिट’ आणि त्याच्या सिक्वेलमध्ये जेम्स कॉर्डन यांनी बीएट्रिक्स पॉटर यांनी रचलेल्या खोडकर सशाला आवाज दिला यांव्यतिरिक्त मार्गोट रॉबी आणि एलिझाबेथ डेबिक्की यानीही अन्य कॅरॅक्टरन्सना आवाज दिलाय.

इटालियन प्रशासनाने इथली सर्व थिएटर बंद करण्याच्या निर्णयाच्या नंतर आणि इतर युरोपियन सरकारांनी देखील लोकांमध्ये या व्हायरसचा प्रसार होण्याबाबत खबरदारीची सूचना दिल्यानंतर हे पाऊल उचलले गेले.