Take a fresh look at your lifestyle.

हॉलीवूड स्टार ब्रूस विलिसचा सिनेइंडस्ट्रीला राम राम; लँग्वेज डिसॉर्डरमूळे घेतला मोठा निर्णय

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ब्रूस विलिस हा प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आहे. आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अ‍ॅक्शन हिरो ब्रूस विलिसने आता आपल्या अभिनय कारकिर्दीला बाय-बाय म्हटले आहे. इंडस्ट्रीत 40 वर्षांहून अधिक काळ घालवल्यानंतर, 67 वर्षीय ब्रूस विलिसने अभिनयातून रिटायरमेंट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने अचानक हा निर्णय घेतल्याने त्याचे चाहते निराश झाले आहेत. वास्तविक, ब्रुस विलिस दीर्घकाळापासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. याच कारणामुळे त्याने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्याच्या कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी केले आणि ब्रूसला Aphasia हा आजार असल्याचे सांगितले आहे.

ब्रुस विलिसला Aphasia हा लँग्वेज डिसॉर्डर आहे. यामध्ये बोलणे आणि लिहिणे अवघड जाते. हा विकार मेंदूला झालेल्या नुकसानामुळे होतो. जो लँग्वेज एक्सप्रेशन आणि समज कंट्रोल करतो. ब्रेन ट्यूमर, स्ट्रोक वा डोक्याला दुखापत झाल्याने हा आजार होतो. ब्रूसच्या कुटुंबीयांनी जरी केलेल्या निवेदनात लिहिले कि, ‘ब्रुसच्या अद्भुत फॅन्सना, एक कुटुंब म्हणून आम्हाला हे सांगायचे आहे की, आपल्या प्रिय ब्रूसला काही हेल्थ प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्या अलीकडील Aphasia आजाराचे निदान झाले आहे. यामुळे त्याने आपली अभिनय कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आमच्या कुटुंबासाठी ही आव्हानात्मक वेळ आहे. आम्ही तुमच्या निरंतर प्रेम आणि समर्थनाची प्रशंसा करतो. आम्ही एक मजबूत कुटुंब म्हणून वाढत आहोत. ब्रुस तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आम्हांला माहीत आहे. ब्रुस नेहमी म्हणायचा कि, जगा आणि आता आम्ही तेच करू इच्छितो’.

67 वर्षीय ब्रूस विलिसने 1980 च्या टीव्ही मालिका मूनलाइटिंगने प्रसिद्धी मिळवली. यानंतर त्याने ‘डाय हार्ड’ या प्रसिद्ध फिल्म फ्रँचायझीमध्ये काम केले. ब्रूस विलिसने आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ब्रूस विलिसने आपल्या कारकिर्दीत गोल्डन ग्लोब आणि दोन एमी पुरस्कार जिंकले आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ‘द वर्डिक्ट’, ‘मूनलाइटिंग’, ‘द बॉक्सिंग’, ‘होस्टेज’, ‘आउट ऑफ डेथ’, ‘ग्लास’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.