Take a fresh look at your lifestyle.

‘किचन कल्लाकार’चा होस्ट बदलणार?; संकर्षणची जागा श्रेया बुगडे घेणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच झी मराठी वाहिनीवर सुरु झालेला ‘किचन कल्लाकार’ हा शो चांगलाच कल्ला करताना दिसतोय. यामध्ये कलाकारांच्या हातचे पदार्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरच जे कलाकार आपले भरभरून मनोरंजन करत असतात ते पोट भरण्यासाठी काय काय बनवू शकतात याचा इथे अंदाज येत आहे. यामध्ये महागुरू म्हणून अभिनेते प्रशांत दामले तर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दिसतो आहे. परंतु नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच संकर्षणची जागा हास्यक्वीन श्रेया बुगडे घेणार आहे. हि बातमी थोडी ख़ुशी थोडी गम अशी भावना निर्माण करणारी आहे.

‘किचन कल्लाकार’ या खमंग खुसखुशीत शोने अगदी अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या शोमध्ये कलाकारांपासून अगदी राजकीय व्यक्तीदेखील सहभाग घेताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना याची भुरळ पडणे फार साहजिक आहे. या शोमध्ये प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे असल्यामुळे मजा मस्ती कल्ला होणार यात काही वादच नाही.

पण आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, संकर्षण कऱ्हाडे हा शो सोडणार आहे. त्याच्या जागी ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेची एन्ट्री होणार आहे. या बातमीने सगळेच चक्रावले आहेत. संकर्षणने शो का सोडला याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. तर या चर्चा आणि प्रश्नांचे निरसन आम्ही तुम्हाला देऊ.

त्याच झालं असं कि, ‘किचन कल्लाकर’ मध्ये श्रेया बुगडेची एन्ट्री होणार आहे. पण अगदीच काही दिवसांसाठी. कारण, संकर्षण काही कारणासाठी शोमधून ब्रेक घेत आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थित किचन कल्लाकारची धुरा अभिनेत्री श्रेया बुगडेच्या हाती सोपवली जात आहे. म्हणजे सूत्रसंचालन आणि कल्ला दोन्ही आता श्रेयाच्या हाती. पण मित्रांनो, संकर्षण आपलं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या शोमध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे संकर्षणचे चाहते नाराज व्हायचं कारण नाही. कारण श्रेया बुगडे ‘किचन कल्लाकार’ मध्ये येणार म्हणजे या शोमध्ये आता फोडणीसोबतच विनोदाचा तडका लागणार हे नक्की.