Take a fresh look at your lifestyle.

सारा अली खान चा ‘बिकिनी’ लुक बघून व्हाल घायाळ….

0

चंदेरी दुनिया । अभिनेत्री सारा अली खान हिची कोणतीही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही कारण तिने रुपेरी पडद्यावर बॅक टू बॅक कमाल कामगिरी करून स्वत: साठी बॉलीवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मुख्य म्हणजे साराने सध्या आपल्या बिझी शेड्यूलमधून ब्रेक घेतला आहे. सारा तिच्या भावासोबत म्हणजेच इब्राहिम अली खानबरोबर करीना कपूर खानच्या ख्रिसमस बॅशमध्ये शेवटची दिसली होती. या मुंबईत झालेल्या पार्टीत ‘ख्रिसमस डे’ साजरा केल्यानंतर सारा अली खान बुधवारी मालदिवसाठी रवाना झाली.

इंस्टाग्रामवर तिने या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती आपल्याला इंटरनॅशन डेस्टिनेशनवर गेलेली दिसते. निळ्या पाण्यात, ती तिच्या मैत्रिणींसह मजा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिने या शूट दरम्यान बिकिनी परिधान केली आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

सारा तिच्या जिवलग मैत्रिणीसोबत म्हणजेच काम्या अरोरासोबत सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेत आहे. आणि तिच्या या बिकिनी लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

यापूर्वी तिने आपल्या भावासोबत केलेल्या ख्रिसमस फोटोशूट मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर तिने तिच्या वडिलांसोबत म्हणजेच सैफ अली खानसोबत सुद्धा एक फोटो शेअर केला होतं. यावरून स्पष्ट दिसते की ती केवळ तिची व्यावसायिक बांधिलकी सांभाळत नाही तर तिच्या कुटुंबालाही तितकाच वेळ देते.

दरम्यान, सारा अली खान लवकरच ‘लव्ह आज कल’ च्या सिक्वलमध्ये झळकणार आहे. आणि चित्रपटाच्या शूटिंगनंतरच तिने हा ब्रेक घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.