Take a fresh look at your lifestyle.

किती Fake वागतेस?; सारंगी बिगबॉस म्हणणाऱ्या स्नेहावर चाहते वैतागले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘बिग बॉस मराठीच्या घरात एकापेक्षा एक हटके टास्क आणि टास्कमध्ये वाद सुरु आहेत. या दरम्यान वाद आणि टास्क सोडून कुणी चर्चेत असेल तर ती आहे स्नेहा वाघ. मुळात याचं कारणंही वेगळं आहे. पण हे कारण असं आहे ज्यामुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत. स्नेहा वाघ बिग बॉसच्या घरात आली अगदी तेव्हापासून चर्चेत आहे. शोमध्ये सहभागी झाल्यानंतर आधी ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आणि त्यानंतर जयसोबतच्या मैत्रीमुळे. याशिवाय ती सकाळी उठल्यानंतर मस्त नाचते मजा करते आणि मग कॅमेरात येऊन सारंगी बिग बॉस म्हणते. तिच्या या सारंगी शब्दावर चाहते इतके भडकले आहेत का तिची अक्कल काढू लागले आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात स्नेहा वाघ आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती अविष्कार दारव्हेकरही सहभागी झाला होता. त्यामुळे दोघांच्या नात्यावरही प्रचंड चर्चा झाली. पण याहीपेक्षा जास्त चर्चा झाली ती स्नेहा वाघच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात अविष्कारने तिचा छळ केल्याचे तिने म्हटले होते. नऊ वर्ष दोघांचा संसार टिकला. शेवटी दोघेही घटस्फोट घेत वेगळे झाले. अविष्कार आता शोचा भाग नाही. घरात त्याची कामिगीरी काही खास नव्हती. नुकताच तो एव्हिक्ट होऊन घराबाहेर पडला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा स्नेहा चर्चेत आलीये ती सारंगी बिग बॉस यामुळे.

स्नेहा रोज सकाळी उठून जेव्हा जेव्हा सारंगी ‘बिग बॉस म्हणते तेव्हा तेव्हा चाहत्यांचा नाराजीचा सूर छेडला जातो. यासाठी सोशल मीडियावर व्हायरल झालेले तिचे अनेक व्हिडीओ कारणीभूत आहेत. या व्हिडीओवर रसिकांच्या संतप्त प्रतिक्रीया उमटल्याचे पाहायला मिळतं आहे. रोज सकाळी स्नेहा झोपेतून उठल्यावर बिग बॉसच्या घरात लावलेल्या कॅमेरा समोर येते. ‘सारंगी बिग बॉस’, गुड मॉर्निंग असे बोलताना दिसते. ‘सारंगी’ म्हणजे काय ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर त्याचे उत्तर असे कि हा एक कोरियन शब्द आहे. सारंगी याचा अर्थ “आय लव यू” असा होतो. सारंगी बिग बॉस म्हणजेच बिग बॉस आय लव यु.

 

तीच रोज उठून असं सारंगी बिग बॉस बोलणं आणि लाडात येऊन एक्स्प्रेशन देणं हे काही चाहत्यांना भावलं नाही. यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा वेगळाच सूर दिसतोय. अनेकांनी स्नेहाला या सारंगीवरून चांगलीच झापली आहे. इतकेच काय तर तुला अक्कल आहे का?, हि बाई मूर्ख आहे, तू जा ग बये अश्या विविध प्रतिक्रियांमधून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.