हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आपल्या फिटनेसमुळे अनेकांचा आवडता हिरो आहे. हृतिकचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे हृतिकच्या फेन्समध्ये काहीशी नाराजी पसरली आहे. सेल्फी काढणाऱ्या एका चाहत्याला हृतिकने ढकलून दिल्याचा एक व्हडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
शुक्रवारी हृतिक रोशन (Hrithik Roshan) आपल्या कुटुंबियांसोबत रणबीर अन आलियाच्या नवा चित्रपट ब्रह्मास्त्र पाहायला गेला होता. यावेळी चित्रपट गृहातून बाहेर आल्यानंतर ह्रतिकला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. यादरम्यान एक चाहता हृतिकसोबत सेल्फी काढणासाठी पुढे आला. जबरदस्ती सेल्फी काढणाऱ्या चाहत्याला पाहून हृतिक चांगलाच भडकला. क्या कर रहे हो? असा प्रश्न करत हृतिकने चाहत्याला ढकलून दिले. या घटनेचा व्हिडीओ कोणीतरी शूट केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.
फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांच्या मागे पुढे सतत चाहत्यांची वर्दळ असते. बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्री असेल तर त्यांचा फॅन फॉलोअर खूप मोठा असतो. आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत सेल्फी काढावी असं प्रत्येक चाहत्याला वाटत असते. मात्र काहीवेळा असे सेल्फी काढणे वादाचा विषय होतो. नुकत्याच घडलेल्या हृतिक रोशनसोबतच्या घटनेने याचीच प्रचिती आली आहे. Hrithik Roshan
दरम्यान, हृतिकच्या सुरक्षा रक्षकाने वेळीच मध्यस्थी करत सदर चाहत्याला बाजूला केले. तसेच इथे गर्दी करू नका असं म्हणत हृत्कला वाट करून दिली. यापूर्वीही अनेकवेळा बॉलिवूड सेलिब्रिटींच्याबाबतीत अशी घटना घडली आहे. सेलिब्रिटींनी अशा वेळी आपल्या रागावर संयम राखायला हवाच पण त्यासोबतच चाहत्यांनाही आपल्या वागण्यामुळे समोरच्याला काही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Discussion about this post