Take a fresh look at your lifestyle.

हृतिक रोशनची पूर्वपत्नी सुझेन आणि कॉमेडियन वीरदासला कोरोनाची लागण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. दरम्यान जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना सर्व सामान्य, राजकीय मंडळी, कलाकार असे सारेच कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यानंतर आता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खानला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कॉमेडियन वीर दास यालाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत दोघांनीही आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

 

 

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन हिने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यात तिने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. याशिवाय आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कॉमेडियन वीरदासलाही कोरोनाने गाठलंय. आपल्या तब्येतीविषयी सांगताना वीरदासने इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीये. कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. मी घरातच क्वॉरंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. काळजी करू नका… पण काळजी घ्या.

 

 

गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. सेलिब्रिटींपैकी दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू, बॉलिवूड निर्माता मधुर भंडारकर, अभिनेत्री स्वरा भास्कर, विशाल दादलानी, प्रतीक बब्बर या कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर गायक अरिजीत सिंह, नफीसा अली सोढी, मानवी गगरू यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.