Take a fresh look at your lifestyle.

पतीला अटक झाली आणि शिल्पा शेट्टी सुपर डान्सर ४ मधून गायब झाली; काय आहे प्रकरण?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवुड जगतातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि फिटनेस फ्रिक असलेली शिल्पा शेट्टी सध्या सुपर डान्सर ४ या रिअ‍ॅलिटी शो’ची जज म्हणून आपल्याक दिसत होती. होती म्हणण्याचं कारण असं कि आता मात्र ती या शो मध्ये पुसटशी सुद्धा दिसत नाहीये. त्याचे झाले असे कि, माध्यमांतील वृत्तांनुसार, तिचा पती राज कुंद्रा याला अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या फिल्म्स अ‍ॅपच्या माध्यमाने प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे आणि याच नंतर शिल्पा शोच्या शूटिंगसाठी गेली नाही.

डीएनएच्या वृत्तानुसार, मंगळवारी शिल्पाचे शोचे शूटिंग शेड्यूल होते. मात्र, ती या शूटिंगसाठी गेलीच नाही. कारण सोमवारी रात्री राज कुंद्राला मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली होती. यानंतर माध्यमांतील इतर वृत्तांनुसार, शिल्पा सध्या तिची बहीण शमिता आणि आईसोबत मुंबईतील जुहूस्थित बंगल्यात आहे. शिल्पा सुपर डान्सर शोमुळे नेहमीच चर्चेत असते. तिची सुपर से उपर बोलण्याची अदा तर कातिलाना आहे. मात्र शिल्पाच्या पतीवर गंभीर आरोप झाल्यानंतर हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. कदाचित यामुळेच का काय शिल्पा मात्र माध्यमांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतेय.

पुढील वृत्त असे आहे, राज शिवाय इतर ५ लोकांनादेखील संदर्भात अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये याप्रकरणी केससुद्धा दाखल करण्यात आली होती. शिवाय राज कुंद्राचे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप चॅटदेखील पुराव्याप्रमाणे समोर आले आहेत. या ग्रुपच्या माध्यमाने राज त्याच्या बिझनेस संदर्भात चर्चा करत होता. मंगळवारी २० जुलै २०२१ रोजी राज कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता त्याला २३ जुलै २०२१ पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. मात्र या सगळ्या प्रकारात अद्यापही शिल्पा समोर येऊन काहीही बोलली नाही हे थोडे नवलंच. असो.. शिल्पाच्या वर्क फ्रंटसंदर्भात सांगायचे तर, ती हंगामा- २ मध्ये परेश रावल आणि मिजान जाफरी यांच्यासह लवकरच दिसणार आहे.