Take a fresh look at your lifestyle.

मी देशातील सर्वात शक्तिशाली महिला आहे; कंगना रनौतची इंस्टा स्टोरी चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे या ना त्या वादांमध्ये अडकल्याचे दिसून येते. जणू वाद, टीका आणि द्वेष यांच्यासह तिचं पूर्वजन्मीचे नातं असावं. देशातील कोणत्याही मुद्द्यांवर ती अगदी रोखठोक आणि परखड मत व्यक्त करताना कधीच घाबरत नाही. त्यामुळे आपसूकच वाद तिच्याकडे आकर्षित होतात. यानंतर आता अनेकदा वादाच्या कचाट्यात सापडलेल्या कंगनाने स्वत:लाच एक विशेष उपाधी देत इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तिने स्वतःला देशातील सर्वात शक्तिशाली महिला असे संबोधित केले आहे.

आपण सारेच जाणतो कि वादग्रस्त विधानांमुळे कंगना रनौतचे अधिकृत ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. पण यानंतर थांबेल किंवा गप्प बसेल ती कंगना कुठली. यानंतर कंगनाने आपला मोर्चा थेट इंस्टाग्रामकडे वळवला आणि आता ती इंस्टाग्रामवर पोस्ट करीत किंवा एखादी स्टोरी शेअर करत विविध विषयांवर फायरिंग करत असते. एकंदरच काय तर कंगना इंस्टाग्रामवर चांगलीच एॅक्टीव्ह झाली आहे. कंगनाने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ANIने दिलेल्या वृत्ताचं ट्विट शेअर केलं आहे आणि हे ट्विट शेअर करताना तिने स्वत:ला देशातील सर्वात शक्तिशाली महिलेची उपाधी दिली आहे.

अभिनेत्री कंगना रनौतच्या विरोधात तिने केलेल्या धर्म संबंधित वक्तव्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत कंगनाच्या सर्व सोशल मीडिया पोस्टवर भविष्यात सेन्सॉर करण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही याचिका दाखल केली असल्याचं ANIच्या वृत्तात लिहिले आहे. कंगनाने हेच ट्विट तिच्या इंस्टास्टोरीत शेअर केले आणि यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘हा हा हा.. देशातील सर्वात शक्तिशाली महिला’. अगदी काही दिवसांपूर्वी कंगनाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा तिने दावा केला होता आणि नंतर इंस्टावर पोस्ट करीत सोनिया गांधींना संबंधित प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश द्यायला सांगा अशी विनंती केली होती. यानंतर आता स्वत:ला सर्वात शक्तिशाली महिला म्हटल्याने कंगना पुन्हा चर्चेत आल्याचे दिसत आहे.