Take a fresh look at your lifestyle.

मी संपूर्ण व्यवस्थेचा निषेध करते; हिजाब वादात अभिनेत्री जायरा वसीमची एंट्री; सोशल मीडियावर केली जळजळीत पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून हिजाब वादावर कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नसल्यामुळे हा वाद सुरूच आहे. शाळेत वा महाविद्यालयात गणवेषच घालावा या मागणीवर मुस्लिम महिलांकडून हिजाब परिधान करणारच अशी भूमिका असल्याचे या वादात स्पष्ट दिसत आहे. दरम्यान अनेक दिग्गजांनी यावर प्रतिक्रिया देताना शाळेचा गणवेश महत्वाचा आहे अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर आता हिजाब वादात बॉलिवूड अभिनेत्री जायरा वसीमने उडी घेत मोठी पोस्ट शेअर केली आहे.

जायराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले कि, ‘हिजाबला चॉईस आहे, असे समजणे चुकीचेच आहे. इस्लाममध्ये हिजाब हा पर्याय नसून एक बंधन आहे. जेव्हा एखादी महिला हिजाब परिधान करते, तेव्हा ती देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करत असते. जिच्यावर तिचे प्रेम असते आणि तिने स्वतःला त्याच्यासाठी समर्पित केलेले असते. ‘एक महिला म्हणून मी कृतज्ञता आणि नम्रतेने हिजाब घालते. धार्मिक बांधिलकीसाठी महिलांना प्रतिबंधित आणि छळले जात असलेल्या या संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध मी माझी नाराजी आणि निषेध व्यक्त करते. मुस्लिम महिलांसोबत भेदभाव करणे आणि त्यांना शिक्षण आणि हिजाब यापैकी एक निवडावे लागेल किंवा ते सोडून द्यावे लागेल अशी व्यवस्था स्थापन करणे अन्यायकारकच आहे. तुमचा अजेंडा चालवण्यासाठी विशिष्ट निवड स्वीकारण्यास तुम्ही त्यांना भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहात.

‘दंगल’ या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या अभिनेत्री जायरा वसीमने केवळ ३ चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली. इतक्या कमी वेळातही लोकांना तिचे काम खूप आवडले. मात्र कालांतराने अभिनेत्री जायरा वसीमने अचानक चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का लागला. केवळ ३ चित्रपटानंतर जायरा सिनेसृष्टीपासून दूर गेली आणि ती सोशल मीडियावरदेखील फारशी सक्रिय नसते.