Take a fresh look at your lifestyle.

मी ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडलेली नाही’; अफवांवर अभिनेत्री हृता दुर्गुळेचं स्पष्टीकरण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फुलपाखरू फेम अभिनेत्री हृता दुर्गुळेला कोण ओळखत नाही..? या मालिकेने तिला अशी काही ओळख मिळवून दिली कि, तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सध्या हृता दुर्गुळेची झी मराठीवर ‘मन उडू उडू झालं’ हि मालिका प्रक्षेपित होत आहे. या मालिकेच्या माध्यमातून ती नियमितपणे आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही भलतीच चर्चा सुरु होती. या चर्चेत ऋता दुर्गुळेने हि मालिका सोडल्याचे वारंवार समोर येत होते. दरम्यान हृता दुर्गुळेने मालिकेतून निरोप घेतल्याची चर्चा इतकी मोठी झाली होती कि याबाबत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर आता हि अफवा असल्याचे स्पष्टीकरण अभिनेत्रीने दिले आहे.

अभिनेत्रीने स्वत: यासंदर्भात स्पष्टीकरण देताना या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. हृता दुर्गुळे ‘मन उडू उडू झालं’ हि मालिका सोडत असल्याची बातमी संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सर्वाना एकच प्रश्न पडला होता कि हृताने असा निर्णय का घेतला..? त्यामुळे तिला वैयक्तिकदेखील अनेक प्रश्न विचारणारे मेसेज चाहत्यांकडून येत होते. अखेर या सर्व चर्चांवर कुठेतरी पूर्णविराम हवा म्हणून हृताने यावर स्पष्टीकरण दिले आहे. तिने एका मुलाखती दरम्यान सांगितले कि, “मी ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडलेली नाही. या केवळ अफवा आहेत. सध्या मी याच मालिकेचे शूटिंग करत आहे. यासोबत तिने चाहत्यांना विनंती देखील केली आहे कि, प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये”.

मिळालेल्या माहितीनुसार, मालिका अभिनेत्री हृता दुर्गुळेचे ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेच्या निर्मात्यांसह सेटवरच स्वच्छतेच्या कारणांवरून मोठे भांडण झाले होते. हा वाद इतका जास्त वाढला कि यामुळे हृताने ही मालिका सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला अशी फक्त चर्चा सुरु होती. पण हि चर्चा इतकी मोठी झाली कि हि अफवा सत्य वाटू लागले. त्यामुळे अखेर हृताने एका वृत्त वाहिनीशी बोलताना थेट या सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगितले. यानंतर तिने आपण ‘मन उडू उडू झालं’ हि मालिका सोडणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. हृता या मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे आणि या भूमिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत आहेत.