Take a fresh look at your lifestyle.

…ते चित्रपट मी करत नाही; अल्लू अर्जुनने सांगितले मोठमोठे सिनेमे नाकारण्याचे कारण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन. अल्लू अर्जुनाची ख्याती स्टायलिश स्टार अशी आहे. कारण त्याची अदा, त्याची स्टाईल, त्याचा लूक एकदम दर्जा असतो. त्यामुळे अल्लू अर्जुन हा फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकांचा नव्हे तर विविध भाषिक प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आहे. तसेच अल्लू अर्जुनने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेबद्दल प्रेक्षकांना नेहमी आदर वाटतो. कारण आजपर्यंत त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका हि कौटुंबिक आणि सामाजिक मुद्द्यांना लक्षात घेऊन साकारल्या आहेत. याचविषयी बोलताना अल्लू अर्जुनने काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

पुष्पा: द राईज चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एका मुलाखतीत माध्यमांनी अल्लू अर्जुनला प्रश्न विचारून अगदीच भंडावून सोडलं होत. दरम्यान एका प्रश्नच उत्तर देताना अल्लूने अत्यंत सन्मानपूर्वक काही गोष्टींचा खुलासा केला. अभिनेता अल्लू अर्जुन याला एका पत्रकाराने विचारले कि, तुझी इतकी लोकप्रियता असतानाही मोठमोठे सिनेमे का नाकारतोस? तर यावर उत्तर देताना अल्लूने सांगितले कि, ‘जे चित्रपट मी माझ्या पत्नी आणि मुलीसोबत पाहू शकत नाही’, असे चित्रपट मी स्वीकारत नाही किंवा आपण असे म्हणू शकतो कि मी अशा चित्रपटांपासून लांब राहतो.

पुढे म्हणाला कि, त्यासोबतच ‘प्रेक्षकांना काही झालं तर मला त्यांची काळजीही घ्यावी लागेल. हे एक प्रकारे देवाणघेवाणीचं नातं आहे. प्रेक्षकांनी आपल्याला इतकं काही दिलं आहे. त्याच्या बदल्यात आपण काही परतफेड करु शकल्यास हे भाग्यच’. अल्लू अर्जुनने दिलेले उत्तर ऐकून उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हर्ष उमलला आणि जो तो अल्लूचे कौतुक करू लागला. अल्लू अर्जुनची लोकप्रियता प्रचंड आहे.

त्यामुळे त्याची स्टाइल फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. तरुणाईत तर अल्लुची वेगळीच क्रेझ आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनने व्यक्त केलेला विचार हा प्रत्येकाने अवगत केला तर याहून आनंदाची बाब काहीच नाही. अल्लू अर्जुन हा नेहमी व्यावसायिक चित्रपट साकारताना मुलांना तो चित्रपट पाहताना कोणताही संकोचलेपणा वाटणार नाही तर, महिलांनाही चित्रपट पाहताना संकोच वाटू नये याची विशेष काळजी घेतो.