Take a fresh look at your lifestyle.

मी खूप दुःखी आणि निःशब्द झालेय; दिलीप कुमार यांच्या निधनामुळे लता दीदी भावुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील लोकप्रिय अभिनेते दिलीप कुमार यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सध्या संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार आणि राजकीय मंडळी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत आहेत. मृत्यूदरम्यान दिलीप जी ९८ वर्षांचे होते. मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती अत्यंत अस्थिर व नाजूक होती. परिणामी त्यांच्यावर मुंबईतील खारयेथील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अथक प्रयत्नांनंतरही त्यांची त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मात्र भारतीय गान सम्राज्ञी लता मंगेशकर अर्थात दीदी यांनी आपल्या भावाला कायमचे गमावले आहे.यामुळे त्या अत्यंत दुःखी आहेत. त्यांनी नुकतेच दिलीप कुमार यांच्यासोबतचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ट्रॅजेडी किंग अर्थात दिलीप कुमार उर्फ युसूफ यांना राखी बांधत होत्या. मानलेलं नातं का असेना दोघांनीही नेहमीच ह्या नात्याचा आदर केला आहे. यामुळे आज भावाच्या निधनाचे वृत्त समजताच लता दीदींना आपले दुःख अनावर झाले आहे. दरम्यान त्यांनी काही जुने फोटो शेअर करत दुःख व्यक्त केले आहे. लता दीदींनी एकामागे एक बरेच ट्विट केले आहेत. लता मंगेशकर यांनी पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, युसूफ भाई, आज आपल्या छोट्या बहिणीला सोडून गेले. युसूफ भाई, काय गेले, एका युगाचा अंत झाला. मला काहीच सूचत नाही. मी खूप दुःखी आहे. निःशब्द आहे. बऱ्याच गोष्टी आठवणी म्हणून ते देऊन गेले आहेत.

तर अन्य एक ट्विट करताना लता दीदींनी लिहिले कि, युसूफ भाई, मागील कित्येक वर्षांपासून आजारी होते. कोणाला ओळखतही नव्हते. अशा काळात सायरा वहिनीने सर्व काम सोडून दिवस रात्र त्यांची सेवा केली. त्यांच्यासाठी दुसरे काही जीवनच नव्हते. अशा स्त्रीला मी अभिवादन करते आणि युसूफ भाईंच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करते.

दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय आणि चाहते अत्यंत दुःखात आहेत. सध्या त्यांचे चाहते आणि अनेको बॉलिवूड, मराठी आणि अगदी टॉलिवूड सेलिब्रेटी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली देत आहेत. इतकेच नव्हे तर अनेक राजकीय मंडळीदेखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. दिलीप कुमार हे फिल्मफेअरचा पुरस्कार मिळवणारे इंडस्ट्रीतील पहिले कलाकार होते. यामुळे दिलीप कुमार हे अनेको कलाकारांसाठी जणू प्रेरणाच होते. त्यांना पाहून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या कलाकारांची संख्या फार मोठी आहे.