Take a fresh look at your lifestyle.

मी माझी जोडीदार गमावली; सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाच्या बहिणीचे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांच्या सख्ख्या बहिणीचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे विकास यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून आपले दुःख व्यक्त केले आहे. ‘मी माझी जोडीदार गमावली… तिनं या आजाराशी बऱ्याच वर्षांपासून लढा दिला तोही एखाद्या विजेत्यप्रमाणे… आज मात्र शरीरातील बहुविध अवयव निकामी झाल्यामूळे माझ्या मिठीत तिने अखेरचा श्वास घेतला’, अशी भावनिक पोस्ट विकास खन्ना यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. हि पोस्ट पाहून अनेकांचे दिले पाणावले आहेत.

वयाच्या ४७’व्या वर्षी शेफ विकास खन्ना याच्या बहिणने अखेरचा श्वास घेतला. यानंतर विकास खन्ना यांनी आपले दुःख सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करीत आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. विकास खन्ना यांची बहिणी राधिका हिला Lupus, aHUS आजार होता. या आजारासोबत बराच काळ ती झुंज देत होती. मात्र रेनल फेल्युअर आणि शरीरातील अनेक अवयव एकाच वेळी निकामी झाल्यामूळे तिची झुंज थांबली. तिचे निधन हि विकासाच्या आयुष्यातील सर्वात दुर्दैवी घटना आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Khanna (@vikaskhannagroup)

आपल्या बहिणीचं जण विकासला अजूनही मान्य नाही. तिच्या जाण्याने विकासच्या आयुष्यातून एक हक्काची व्यक्ती आपलं म्हणणारी ती कायमची निघून गेली आहे. ज्यातून सावरण्यासाठी आता विकासला बराच वेळ लागतोय. विविध कुकरी शो, रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकपदी असणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय हॉटेलिंग विश्वात भारताचं नाव उंचावणारा सेलिब्रिटी शेफ म्हणून विकास खन्ना याची ओळख आहे.

त्याच्या दुःखात त्याचे सर्व चाहतेदेखील सामील झाले आहेत. कुटुंबाशी खास नातं जपणारा विकास बहिणीच्या जाण्याने आज अतिशय दुःखी झाला आहे आणि यासाठी त्याचे चाहते दुःखातून बाहेर पाडण्यासाठी आधार देत आहेत.