Take a fresh look at your lifestyle.

‘बुरखा- हिजाब’ला माझा विरोध; कर्नाटकातील हिजाब प्रकरणी जावेद अख्तरांचे ट्विट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या कर्नाटक राज्यात अत्यंत पेटलेले हिजाब प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरम्यान मुस्लिम मुली शाळेत हिजाब घालण्यावर ठाम आहेत. तर काही हिंदुत्ववादी गट या निर्णयाला अतिशय तीव्र विरोध करता आहेत. यावर आता सर्वच स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना साहित्यिक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून आपले मत मांडताना माझा बुरखा आणि हिजाबला आधीही विरोध होता आताही आहे असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे ट्विट आणखीच चर्चेत आले आहे.

गीतकार जावेद अख्तर त्यांच्या रोखठोक शैलीसाठी नेहमीच चर्चेत आणि अनेकदा वादात असतात. दरम्यान कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादावर जावेद अख्तर यांनी केलेले ट्विट पाहून अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या ट्विटमध्ये जावेद अख्तर यांनी लिहिले आहे कि, “मी कधीच बुरखा आणि हिजाबच्या बाजूने नव्हतो. ते परिधान करण्याला माझा आधीही विरोध होता आणि आजही आहे. पण कर्नाटकात लहान मुलींना ज्या प्रकारे धमकावलं जातंय ते संतापजनक आहे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. ते चुकीचंच आहे”.

याआधी भाजप खासदार आणि बॉलिवुड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या होत्या कि, “शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा”