Take a fresh look at your lifestyle.

मी सौरभने साकारलेल्या देवाच्या भूमिकेबाबत बोलले; ‘त्या’ वक्तव्याबाबत अभिनेत्रीकडून स्पष्टीकरण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिकेतील अत्यंत लोकप्रिय चेहरा असणारी अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आगामी वेबसीरिजच्या प्रोमोशनसाठी ती भोपाळ मध्ये संपूर्ण टीमसोबत आहे. दरम्यान एका प्रोमोशन इव्हेंटसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या चालू पत्रकार परिषदेत अभिनेत्री श्वेता तिवारीने ब्रा साईज आणि देव यांच्याशी संबंधित अतिशय वादग्रस्त असे विधान केले होते. या विधानामुळे पत्रकार परिषद गाजलीच. शिवाय सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस पडल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर श्वेता विरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. यानंतर अकहर आज अभिनेत्रीने माफी मागून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान मस्करीमध्ये का होईना पण देवाबद्दल वादग्रस्त विधान करून गेली आणि त्यानंतर वादात अडकली. यानंतर लोकांनी तिच्या विधानावर आक्षेप घेतला आणि टीका करण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत आता या अभिनेत्रीने आपली बाजू मांडत सर्वांची माफी मागितली आहे. या प्रकरणी आपली भूमिका मांडताना श्वेताने माध्यमांना सांगितले कि, अलीकडे एका कार्यक्रमात मी काही विधान करून गेले. यातुन माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. माझे विधान चुकीच्या संदर्भात घेतले जात आहे. संदर्भ बघितले तर समजेल… माझे सहकलाकार सौरभ राज जैन यांनी साकारलेल्या देवाच्या भूमिकेच्या संदर्भात मी बोलत होते. माझा स्वतःचा देवावर पूर्ण विश्वास आहे, आस्था आहे त्यामुळे जाणीवपूर्वक वा अनावधानाने मी याबाबत कुणाच्याही भावना दुखावू शकत नाही…”. खरंच माझ्या वाक्याचा अर्थ चुकीचा काढला जात आहे.

त्याच झालं असं कि, लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या आगामी वेब सीरिजच्या प्रोमोशनमध्ये व्यक्त्त आहे. याच वेब सीरिजच्या प्रोमोशनसाठी ती संपूर्ण टीमसोबत भोपाळमध्ये गेली आहे. दरम्यान तिच्या आगामी वेबसीरिजच्या प्रमोशनवेळी चालू पत्रकार परिषदेत तिने देवाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. श्वेता म्हणाली कि, माझ्या ब्रा’चे माप देव घेत आहे. या वक्तव्यामुळे वाद उफाळला आणि अभिनेत्रीवर सर्व स्तरांतून जोरदार टीकांचा वर्षाव सुरु झाला आहे. इतकेच नव्हे तर ट्विटरवर तिच्या आगामी वेबसिरीजचा निषेध करीत बॉयकॉटची मागणी होत आहे.