Take a fresh look at your lifestyle.

मी मुलांना Vaccine दिलं..तुम्ही ?; गायक, संगीतकार सलील कुलकर्णींचा चाहत्यांना थेट सवाल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने बघता बघता अनेकांना आपल्या विळख्यात ओढले आहे. ओमिक्रॉन विषाणू सौम्य असल्यामुळे अनेकजण अजूनही या विषाणूला सामान्य समजत आहेत. पण ओमिक्रॉनचा संसर्ग अतिशय वेगाने होताना दिसत आहे. शिवाय WHO’ने सांगितल्याप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट लवकरच येईल आणि या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होईल. त्यामुळे राज्यात लहान मुलांच्या लसीकरणाला ३ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. यानंतर आता गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी आपल्या मुलांना व्हॅक्सिन दिले आणि चाहत्यांना तुम्ही तुमच्या मुलांना व्हॅक्सिन कधी देणार? असे विचारत व्हॅक्सिन घेण्याचे आवाहन केले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय गायक, गीतकार आणि संगीतकार सलील कुलकर्णी याना शुभंकर कुलकर्णी आणि अनन्य कुलकर्णी अशी दोन मुले आहेत. सध्या राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मुलांना भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या Covaxin लसीचे डोस देणे सुरक्षित आहे असेही कंपनीने सांगितल्यामुळे पालकदेखील निर्धास्त आहेत. यानंतर सलील कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडिया ट्विटर हँड्लच्या माध्यमातून एक ट्विट करत शुभंकर आणि अनन्य यांना लसीचा डोस दिल्याचे पोस्ट केले आहे.

सलील कुलकर्णी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, मी मुलांना Vaccine दिलं..तुम्ही? या ट्विटसोबत त्यांनी व्हॅक्सिन घेतल्यानंतर काढलेला एक सेल्फी पोस्ट केला आहे. याशिवाय ट्विट नीट वाचले तर समजते कि, सलील यांनी आपल्या चाहत्यांना आपल्या लहान मुलांना व्हॅक्सिन देण्यासाठी आवाहन केले आहे. अनेकांनी आपली प्रतिक्रिया देत या ट्विटच्या रिट्विट बॉक्समध्ये लिहिले की, हो सर लवकरच आम्हीपण देऊ. तर अन्य एका युजरने लिहिले कि, होय.. आम्हीपण मुलांना लस दिली.