Take a fresh look at your lifestyle.

‘मैं झुकेगा नहीं’; अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा- द राइज’च्या हिंदी डबसाठी मराठमोळ्या अभिनेत्याने दिला आवाज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनाचा अलीकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘पुष्पा द राइज’ हा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामे करताना दिसतोय. मुख्य म्हणजे या चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे दोघे एकत्र चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. चित्रपटाचे कथानक, नायक नायिकेची केमेस्ट्री, इतर कलाकारांचा अभिनय सर्व काही सुपर से उप्पर आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट विविध भाषांमध्ये रिलीज झाला असून सर्व भाषांमध्ये या चित्रपटाने कमाल कामगिरी केली आहे. अगदी हिंदी भाषेतसुद्धा हा चित्रपट हिट जाताना दिसतोय आणि याचे श्रेय एका मराठी अभिनेत्याला जातेय. कारण चित्रपटातील नायकाला त्याने आवाज दिला आहे आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून श्रेयस तळपदे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

हिंदी भाषेत पुष्पा चित्रपट हिट जाण्यामागे फक्त आणि फक्त एकाच कलाकाराचा हात आहे तो म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे. या बातमीचे मुख्य उद्देश्य असे कि फार कमी लोकांनी हे माहित आहे कि पुष्पा द राइज चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला अल्लू अर्जुनसाठी श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. याबाबतची माहिती स्वतः श्रेयसनेच सोशल मीडियावर पोस्ट करत फिली आहे. यासोबत श्रेयसने लिहिले कि, ‘पुष्पा द राइज’ सिनेमाच्या निमित्ताने भारतातील सर्वात सामर्थ्यवान आणि स्टायलिश अभिनेत्याचा हिंदीमधील आवाज झाल्याबद्दल अभिमान वाटतोय.

या चित्रपटातील ‘मैं झुकेगा नहीं’ हा डायलॉग चांगलाच हिट गेला आहे. श्रेयसने अतिशय उत्तमरीत्या अल्लू अर्जुनच्या पात्राला साजेसा आवाज दिला आहे. एकंदरच अल्लुची स्टाईल, रश्मिकाची अदा आणि श्रेयसचा आवाज यांनी बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. पुष्पा द राईज हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी सर्व भाषांमधून भरभरून प्रतिसाद दिला आहे. दरम्यान निर्मात्यांनी या सिनेमाचे ओटीटी प्रसारणाचे हक्क अॅमेझॉन प्राईमला दिले आहेत. त्यामुळे लवकरच ओटीटीवर पुष्पा रिलीज होणार आहे. अद्याप तारीख निश्चित केलेली नसली तरी येत्या वर्षात ओटीटी रिलीज निश्चित आहे.