‘मी पोस्ट डिलिट करणार नाही..’; 18 मे पर्यंत केतकी चितळेला पोलिसांचा पाहुणचार
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शनिवारी संपूर्ण दिवसभरात मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचीच चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे संपूर्ण राजकीय क्षेत्रापासून ते कलाविश्वापर्यंत सर्वत्र खळबळ उडाली होती. तिची हि पोस्ट तिला चांगलीच भोवली आहे. राष्ट्रवादीचे समर्थक आणि नेते मंडळी इतके आक्रमक्र झाले कि, त्यांनी केतकीवर संपूर्ण राज्यभरात गुन्हा दाखल करीत कारवाईची मागणी केली. यानंतर अखेर तिला ठाणे पोलिसांनी अटक केली. इतक्या टीका इतका रोष इतका संताप सहन करूनही आज कोर्टात मात्र केतकीने पोस्ट डिलीट करणार नाही असे स्पष्ट सांगितले. यानंतर तिला येत्या १८ मेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
केतकीच्या पोस्टच्या निषेधार्थ अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा समावेश आहे. मात्र आज जेव्हा केतकीला कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा तिने स्वतःची बाजु स्पष्ट केली. यावेळी ती म्हणाली, मी माझी पोस्ट डिलीट करणार नाही, मला बोलण्याचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही का? मी ती पोस्ट स्वत: लिहिली नाही. मी ती कुठूनतरी कॉपी केली आहे. मी ही स्वखुशीनं पोस्ट केली आहे. केतकीच्या या वक्तव्याचा पुन्हा एकदा सर्व स्तरांवर निषेध केला जातोय. दरम्यान राज ठाकरे यांनी आपले मत स्पष्ट केले.
केतकी चितळेच्या या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आणि ते म्हणाले कि, ”विचारांचा मुकाबला हा विचारांनीच करायचा. केतकीनं ज्याप्रकारे तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या चुकीचे आहेत असेही राज ठाकरे यांनी म्हटले. केतकीने आपल्या पोस्टमध्ये शरद अपमानकारक काव्य पंक्तींचा वापर केला आहे. यात तिने लिहिले आहे कि,
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
– ऍडव्होकेट नितीन भावे. या पोस्टनंतर केतकी चांगलीच ट्रोल झाली आहे. इतकेच नव्हे तर शनिवार संतप्त कार्यकर्त्यांनी तिला पोलीस स्थानकात नेताना तिच्या तोंडाला काळं फासून शाईफेक करीत राग व्यक्त केला आहे.