Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या’ गोष्टी मी कुणालाच देणार नाही; पोस्टच्या माध्यमातून तेजस्विनीने दिलं चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 30, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या हिंमतीवर आपल्या अभिनयाची शैली दाखवत स्वतःचे असे वेगळे विश्व निर्माण केले आहे. तिचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. तिने यशाचे शिखर गाठताना नेहमीच एका व्यक्तीची वारंवार आठवण करून दिली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तेजस्विनीचे बाबा! खरंतर बाबा आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यातला पहिला आणि खरा हिरो असतो. निश्चितच आईच्या आणि बाबांच्या प्रेमाची तुलना होऊच शकत नाही. कारण यांच्या प्रेमात एक वेगळी जादू असते. आई जखमेवर फुंकर घालते तर बाबा जखम विसरायला शिकवतात.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

आज भले तेजस्विनीचे बाबा हयात नसतील पण तिने बाबांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देणे विसरली नाही. तर २८ नोव्हेंबर रोजी तेजस्विनीच्या बाबांचा वाढदिवस होता आणि त्या दिवसाचे औचित्य साधून तेजस्विनीने एक खास पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिने आपल्या अनेक चाहत्यांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले. हा प्रश्न म्हणजे, असं काय आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल…? तर याचं उत्तर तिने या खास पोस्टमध्ये दिलं आहे आणि हि पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

इंस्टाग्रामवर पोस्ट करताना तेजस्विनीने लिहिले कि, मला अनेकांनी विचारलं तुझं prized possession काय आहे…..?! घड्याळ, अंगठ्या, कपडे, पर्स,soft toys की आणखी काही….. काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल…! तर ह्या त्या 2 गोष्टी आहेत. माझं माझ्या बाबांवरचं प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. बाबा ने मला माणूस म्हणून घडवलं….बाबाने मला संस्कारासोबत आणखी काय दिलं तर एक चांगला Cook होण्याचा वारसा बाबा देऊन गेला, ठेऊन गेला….

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

हे 2 चमचे आमच्याकडे माझा जन्म झाला तेंव्हापासून आहेत. आम्ही मोठ्या होत असताना बाबा catering student आणि आमचं चहा पावडरचं दुकान होतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हा बहिणींना चहा करायला शिकवला. आमच्याकडे चहा वेगळ्या पद्धतीने बनतो. आणि तो perfect लागतो असं मला वाटतं.
त्या चहा पावडर च्या मापाचा हा एक चमचा. आणि दुसरा तो साखरेचा चमचा. त्याची दांडी तुटली आहे . पण आजतागायत तो चमचा कधी replace झाला नाही. कारण स्वयंपाकातील “प्रमाण” ह्याचं आमच्या घरी जाम महत्व….

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

हे चमचे फक्त माझ्या बाबाची आठवण नसून आमच्या संस्कारातल्या , शिकवणीचं प्रमाण आहे. ज्यावर माझं “प्रमाणाबाहेर” प्रेम आहे. तोलून मापून चहा करता येईल पण बाबावरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य ! आज त्याच्या वाढदिवसा निमित्त लिहावसं वाटलं कारण बाबा चे खूप photos नाहियेत आमच्याकडे. कॅमेराचं महत्व मला कळायच्या आधीच त्याने exit घेतली. आजही तुला तितकंच miss करतो आम्ही बाबा ! जिथे कुठे असशील, देव बरे करो…

Tags: Father LoveInstagram PostMarathi Actresstejaswini panditviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group