Take a fresh look at your lifestyle.

अय्यो.. शेम टू शेम! तेव्हाही आणि आत्ताही.. इब्राहिम दिसायचा अगदी सैफ सारखा हुबेहूब; लहानपणीचे फोटो झाले वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल सेलिब्रिटी किड्स चा जमाना आहे. कधी त्यांच्या लहानपणीचे फोटो तर कधी त्यांचे व्हिडीओ जोरदार चर्चेत असतात. यात सगळ्यात आघाडीवर कुणी असेल तर नवाबांचं घराणं. कधी तैमूर, कधी सारा आणि आता त्यात भर पडली आहे ती जुनिअर नवाबाची. पण सध्या चर्चा सुरु आहे ती सैफच्या मोठ्या मुलाची. म्हणजेच इब्राहिम अली खानची. नुकताच त्याच्या आत्याने त्याचा लहानपणीच फोटो शेअर केला आहे. नवाबांचा हा राजपुत्र दिसायला खरंच देखणा आहे. पण आश्चर्य म्हणजे इब्राहिम अगदी आपल्या वडिलांसारखा म्हणजेच सैफ सारखा दिसतो. तारुण्याप्रमाणे अगदी बालपणात देखील तो सैफचे कार्बन कॉपी होता हे सांगणारा एक फोटो नुकताच इ टाइम्सने अधिकृतरीत्या शेअर केला आहे.

सैफ अली खानची बहीण सबा पतौडीने नुकताच इब्राहिमचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसाठी शेअर केल्याचे दिसत आहे. सोबत, मला आश्चर्य वाटते ….हा कोण ??? मी क्लिक केलेला असे कॅप्शनही दिले आहे. या फोटोत सैफचा मुलगा इब्राहिम अली खान दिसतोय. फक्त हा फोटो त्याच्या लहानपणीचा आहे. तसेच हा फोटो त्याची आत्या सबाने काढलेला असून तिनेच पोस्ट केला आहे. इब्राहिम अली खान हा सैफ आणि अमृता सिंग यांचा मुलगा आहे. काही कारणास्तव घटस्फोट झाल्यानंतर इब्राहिम आपल्या आईसोबत राहू लागला. मात्र त्याची चेहरेपट्टी अगदी सैफ सारखीच आहे.

सबाने फोटो पोस्ट केल्यानंतर अगदी काहीच वेळात इ टाइम्स ने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एका बाजूला इब्राहिमच्या लहानपणीचा हा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला आई शर्मिला सोबत सैफचा. दोघांच्या फोटोत इतके साम्य आहे, कि सैफ कोण आणि इब्राहिम कोण हे ओळखणे जवळजवळ अशक्यच आहे. इब्राहिम नुकताच २० वर्षाचा झाला असून तारुण्यातही वडिलांसारखाच दिसतोय.