मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा तुफान रंगला आहे. सर्वत्र वरूण धवन, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यावर टीका देखील करण्यात आली शिवाय करण जोहर आणि आलिया भट्टला ‘नेपोटीझम प्रमोटर’ म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. आता अभिनेते अन्नू कपूर यांनी घराणेशाही वादावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान घराणेशाहीवर स्पष्टीकरण दिले आहे. ‘आज जर घराणेशाही अस्तित्वात असती तर अमिताभ बच्चन, वासु भगनानी, हरी बावेजा आणि सनीची मुले टॉम क्रूझ झाली असती.’ असं ते म्हणाले. चांगल्या घरात जन्म झाला असला तरी टँलेंट अत्यंत गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
कलासृष्टीमध्ये असं अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या कलेच्या जोरावर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. एखाद्या डॉक्टर किंवा आर्किटेक्टचा मुलगा डॉक्टर किंवा आर्किटेक्ट होऊ शकतो. पण एखाद्या फिल्म स्टारने त्याच्या मुलाला किंवा मुलीला इंडस्ट्रीमध्ये लाँच केले तर आपण नेपोटीझमच्या नावाने का रडतो?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.