Take a fresh look at your lifestyle.

‘जर मुली नसत्या तर….’; राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त बिग बीं’ची भावुक पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २६ सप्टेंबर असून आजचा दिवस राष्ट्रीय कन्या दिन म्हणून साजरा केला जातो. यामुळे सोशल मीडियावर अनेको सेलिब्रिटींनी आपल्या लाडक्या लेकींसाठी छान शुभेच्छापूर्वक तर थोड्या भावुक अश्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यात बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनीही आपल्या लेकीसाठी एक पोस्ट केली आहे आणि हि पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. प्रसंग कोणताही असला तरीही ते सोशल मीडियावर व्यक्त होतात. त्यात आज तर निमित्त आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी सर्व मुलींसाठी खूप गोड संदेश लिहिला आहे. आपली मुलगी श्वेता बच्चन नंदासोबत स्वतःचा एक फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, हॅप्पी डॉटर्स डे. मुली सर्वोत्तम असतात.

बिग बींनी आपली मुलगी श्वेता बच्चन नंदासोबत पोस्ट केलेल्या फोटोत ते दोघेही अत्यंत आनंदी आणि हसताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये बिग बींनी आपल्या मुलीसह या जगभरातील सर्व लेकींना राष्ट्रीय कन्या दिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत आणि यासह त्यांनी पुढे लिहिले आहे की जर मुली नसत्या तर जग, समाज, संस्कृती सर्व अनुपस्थित असते. हि पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या विचारांचे समर्थन केले आहे. इतकेच नव्हे तर या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांच्या कमेंट्सचा वर्षावसुद्धा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आजच्या खास दिवशी आपली मुलगी श्वेता बच्चन नंदासोबतचा स्वतःचा आणखी एक फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, प्रत्येक दिवस आपल्या मुलीला समर्पित. हॅप्पी डॉटर्स-डे …. हि पोस्ट पाहिल्यानंतर श्वेता बच्चन नंदानेही अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर हार्ट इमोजी बनवून प्रतिक्रिया दिली आहे. गतवर्षी देखील अमिताभ बच्चन यांनी कन्यादिनाच्या निमित्ताने त्यांची मुलगी श्वेतासोबत फोटोंचा एक गोड कोलाज फोटो शेअर केला होता.