Take a fresh look at your lifestyle.

पाणी डोक्यावरून जायला लागलं तर..; वानखेडेंच्या समर्थनार्थ क्रांती रेडकरचा सूचक इशारा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुंबईत आज पत्रकार परिषद घेत वानखेडेंवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच पाणी डोक्यावरुन जायला लागलं तर आपण न्यायालयात धाव घेऊ असंही त्या म्हणाल्या.

समीर वानखेडे यांनी त्यांच्या कामात कुठेही त्यांनी खोटेपणा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांना काहीही अर्थ नाही. समीर यांच्या कामाच्या शैलीमुळे अनेकांना त्रास होत आहे. समीर यांच्यामुळे काही लोकांना आपले स्वार्थ साध्य करता येत नाहीयेत. म्हणून अशा प्रकारे आरोप करण्याचं काम सुरू आहे. मात्र ते निश्चितच या सगळ्यातून बाहेर पडतील. कारण विजय सत्याचाच होतो असेही त्या म्हणाल्या.

या परिषदेदरम्यान उपस्थित समीर वानखेडे यांच्या भगिनी जास्मिन वानखेडे नवाब मलिक यांचे नाव न घेता म्हणाल्या कि, जन्म दाखला शोधणारा तो (नवाब मलिक) कोण आहे? आम्हाला मृत्यू, धमकीचे कॉल येत आहेत. मला असे वाटते की मी देखील खोटे पुरावे सादर केले पाहिजेत…तुम्हांला कधी कोणी जात, धर्म विचारला आहे का असा सवाल त्यांनी केला. जातीचे धर्माचे सगळे पुरावे आम्ही दिले आहेत आणखी काय हवं असेही त्या म्हणाल्या.