Take a fresh look at your lifestyle.

‘या’ प्रश्नाचं उत्तर मिळालं तर कंगना पद्मश्री परत करणार; काय आहे सवाल? जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारताला १९४७ साली भीक मिळाली होती. पण खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने केल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. नुकताच कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार देखील काढून घेण्यात यावा अशी मागणीदेखील लोकांकडून करण्यात येत आहे. इतकेच काय तर राणेक राजकीय मंडळींनी कंगना विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे मत व्यक्त केले आहे. यानंतर आता कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत टीकाकरांवर निशाणा साधला आहे.

यात कंगना रनौत म्हणतेय कि, त्या मुलाखतीत सगळ्या गोष्ट मी स्पष्टपणे म्हटल्या. १८५७ मध्ये स्वातंत्र्यासाठी पहिला संघटित संघर्ष झाला. सोबत सुभाष चंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकरांनी बलिदानावरही भाष्य केलं. १९८७ बद्दल मला माहीत आहे. पण १९४७ मध्ये कोणता लढा देण्यात आला त्याची मला माहिती नाही. जर कोणी माझ्या माहितीत भर घातली, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन. मी राणी लक्ष्मीबाई सारख्या शहिदाच्या आयुष्यावर आधारित फीचर फिल्ममध्ये काम केलं आहे. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामावर बरंच संशोधन केलं. राष्ट्रवादासोबतच दक्षिणपंथाचाही उदय झाला. मग हा अचानक तो संपुष्टात कसा आला? गांधींनी भगतसिंगांना का मरू दिलं? नेता बोस यांची हत्या का झाली?  असा सवाल कंगनाने केला

त्याच झालं असं कि, पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका मुलाखतीदरम्यान कंगना म्हणाली, ‘रक्त वाहणारचं होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. १९४७ मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर २०१४ ला मिळालं आहे.’ यावर मुलाखतकार कंगनाला म्हणाली की, ‘म्हणूनच तुम्हाला लोक भगवा म्हणतात’. यानंतर यावर जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला. मात्र, आता टाळ्यांच्या गडगडाटानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकांचा पाऊस पाहायला मिळतोय.