Take a fresh look at your lifestyle.

गोव्यात रंगणार IFFI 2021; भारतातील सर्वात मोठ्या 52’व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास प्रारंभ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आशिया खंडातील अत्यंत जुना आणि तितकाच सन्माननीय महोत्सव IFFI ला आजपासून सुरुवात होत आहे. भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून याची ख्याती आहे. आज शनिवारपासून गोवा राज्यात हा IFFI २०२१ च्या ५२व्या महोत्सवास मोठ्या उत्साहात मात्र कोरोनाचे नियम पाळून सुरू होत आहे. आजपासून ८ दिवस हा महोत्सव रंगेल.

तर या महोत्सवात OTT प्लॅटफॉर्म प्रथमच सहभागी होत आहे. २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा केला जाणार आहे. IFFI २०२१ मध्ये हॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक इस्तवान स्झाबो आणि मार्टिन स्कोर्से यांना ‘सत्यजित रे लाइफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ या पुरस्कारने सन्मानित करणार आहेत.

मुख्य बाब म्हणजे यंदा पहिल्यांदाच OTT प्लॅटफॉर्म या महोत्सवात सहभागी होत आहे. यात नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम, झी ५, वूट आणि सोनी लिव्ह यांसारख्या मोठ्या OTT प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून या चित्रपट महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सत्यजित रे’ यांचे अनेक चित्रपट दाखवले जातील.

दरवर्षी IFFI चित्रपट महोत्सवादरम्यान भारतातील आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवले जातात. यादरम्यान, अकादमी पुरस्कार, २०२२ साठी भारताचा प्रवेश, भारतीय पॅनोरमा विभागात तमिळ चित्रपट ‘कोझंगल’ प्रदर्शित केला जाईल. शंभरात घेण्यात आलेल्या एका स्पर्धेद्वारे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या युवा चित्रपट निर्मात्यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून ४००हुन अधिक अर्ज सादर करण्यात आले होते. यातील ७५ सर्जनशील निर्माते निवडण्याचे काम खालील मुख्य परीक्षक मंडळ आणि निवड परीक्षक मंडळ यांच्याकडे होते –

मुख्य परीक्षक

प्रसून जोशी – प्रसिध्द गीतकार आणि सीएफबीसीचे अध्यक्ष

केतन मेहता – प्रसिध्द दिग्दर्शक

शंकर महादेवन – प्रसिध्द भारतीय संगीतकार आणि गायक

मनोज वाजपेयी – प्रसिध्द अभिनेता

रसूल पुकुट्टी – ऑस्कर विजेते ध्वनी मुद्रक

विपुल अमृतलाल शाह – प्रख्यात निर्माते आणि दिग्दर्शक

निवड परीक्षक

वाणी त्रिपाठी टिकू – निर्माती, अभिनेत्री आणि सीएफबीसी सदस्य

अनंत विजय – लेखक आणि चित्रपट विषयावरील उत्तम लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते

यतींद्र मिश्र – प्रख्यात लेखक आणि इतर प्रकारांतील लिखाण करणारे तसेच चित्रपट विषयावरील उत्तम लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते

संजय पूरण सिंग – चित्रपट निर्माता, उत्कृष्ट चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते

सचिन खेडेकर – अभिनेता, दिग्दर्शक