हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वातील तारे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील विविध गोष्टींमुळे नेहमीच समाज माध्यमांमध्ये चर्चेत असतात. कधी रिलेशनशिप, कधी लग्न, कधी घटस्फोट तर कधी बेबी शॉवर. सध्या सोशल मीडियावर सब गजब फेम प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ प्रचंड चर्चेत आहे. मुख्य म्हणजे या चर्चेचे कारण लग्न किंवा रिलेशनशिप नाहीये. तर लग्नाआधीचं गर्भारपण हा या चर्चेचा विषय आहे. इलियाना अविवाहित आहे मात्र लवकरच ती बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ती बेबी बंपदेखील फ्लोन्ट करताना दिसत आहे. नुकतेच व्हायरल झालेले हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा इलियानाला या बाळाचे वडील कोण आहेत..? असा सवाल केला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रुझ ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे तिचा सोशल मीडियावरील फॉलोवर्सचा आकडा चांगला मोठा आहे. प्रेग्नेंसीच्या बातमी पासून ते आता बेबी बंप फ्लोन्ट करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. तिच्या प्रेग्नेंसीची सोशल मीडियावर सतत चर्चा रंगताना दिसते. अशातच ती अविवाहित आई होणार असल्याने जरा जास्तच तिच्याबद्दल बोललं जात आहे. दरम्यान तिने सोशल मीडियावर अतिशय बिनधास्त पद्धतीने बेबी बंप फ्लोन्ट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा बाळाच्या वडिलांच्या नावाची विचारणा केली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेले हे बेबी बंप फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये इलियानाने काळ्या रंगाचा हाय स्लिट स्लिव्हलेस गाऊन परिधान केला आहे. तिच्या चेहऱ्यावरील भाव फारच सुखकर आणि प्रेग्नसी ग्लो लक्षवेधी आहे.
तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर अन्य नेटकऱ्यांनी ‘आधी सांग बाळाच्या वडिलांचे नाव काय..?’, ‘या बाळाचा बाप कोण आहे..?’, ‘लग्नाआधी बाळाची हौस..’. ‘बेबी बंप फॉन्ट करायला लग्न कशाला पाहिजे..’. ‘अशा मुलींमुळे देश बर्बाद होतोय आणि केरला स्टोरी बनतोय’, ‘लग्नाआधीच बाळ जन्माला घालतेय. हिला लाज वाटली पाहिजे’. अशा विविध कमेंट केल्या आहेत. अशी चर्चा आहे कि, इलियाना ही कॅटरिना कैफचा भाऊ सेमेस्टर मिशेलला डेट करत आहे. त्यामुळे हे बाळ त्याच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध चर्चा अन ट्रोलिंग चालू असूनही इलियानाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे आणि ती स्वतःच आईपण एन्जॉय करताना दिसत आहे.
Discussion about this post