Take a fresh look at your lifestyle.

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा; पत्नी संध्या यांच्याकडून हेल्थ अपडेट जारी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडली. यामुळे त्यांना उपचारासाठी त्वरित पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ते ७७ वर्षांचे असल्यामुळे प्रकृतीची चिंता बाळगता डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरित उपचार सुरु केले आहेत. एका दीर्घ आजारावर सध्या अमोल पालेकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यांनतर आता डॉक्टरांनी त्यांचे हेल्थ अपडेट जारी केले आहे. डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल पालेकर यांच्या प्रकृतीत आता बऱ्यापैकी सुधारणा झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मागे १० वर्षांपूर्वीदेखील अमोल यांची प्रकृती अशीच खालावली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका दीर्घ आजारावर सध्या अमोल यांच्यावर उपचार सुरु आहेत. यानंतर आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांनीदेखील दिली आहे. अति धुम्रपान केल्यामुळे पालेर या आजारातून जात असून त्यांना हा त्रास होत आहे. त्यामुळे यापूर्वीही त्यांना याच आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तूर्तास त्यांच्यावर योग्य उपचार सुरु असून काळजी करण्याचे कारण नाही असेही पालेकर यांच्या पत्नी संध्या पालेकर यांनी म्हटले आहे.

अमोल पालेकर हे एक अभिनेता आहेत. यासोबत दिग्दर्शक आणि निर्मातेही आहेत. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. साधारण ७० आणि ८० च्या दशकात पालेकर यांनी हिंदी, मराठी व्यतिरिक्त बंगाली, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. अमोल पालेकर यांनी रजनीगंधा, छोटी सी बात, नरम गरम, गोलमाल, चितचोर, भूमिका, श्रीमान श्रीमती, अनकही, रंग-बिरंगी, घरोंदा, सावन, बातों बातों मे यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांनी मराठीत शांतता कोर्ट चालू आहे या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार पटकावला आहे.