Take a fresh look at your lifestyle.

नववर्षात OTT घेऊन येणार एकापेक्षा एक सरस वेबसिरीज; जाणून घ्या नावे

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मनोरंजन सृष्टीला गेली २ वर्ष जबर आर्थिक फटका बसला. जगभरातील सर्व थिएटर बंद असल्यामुळे अनेक चित्रपट OTT प्लॅटफॉर्मकडे वळले. कारण संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान लोक आपापल्या घरात बंद होते. परिणामी केवळ OTT हा एकमेव मनोरंजासाठीचा उत्तम पर्याय ठरला. OTT मनोरंजनाच्या दृष्टीने २०२१ वर्षात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे आज थिएटर खुली झाली असली तरीही घरगुती मनोरंजनासाठी OTT वर लोकांचे विशेष प्रेम असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उत्तम वेब सिरीज आणि बॉलीवूड चित्रपट विविध OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येत असतात. २०२१ गाजवल्यानंतर आता २०२२ गाजवण्यासाठी OTT सज्ज आहे. या नवीन वर्षात नवे आणि एकापेक्षा एक वेबसिरीज तसेच चित्रपट उपलब्ध होणार आहेत.

१) रुद्र – एज ऑफ डार्कनेस – ‘भुज’ नंतर आता अजय देवगन २०२२ मध्ये वेब सीरिजमध्ये पदार्पण करतोय. ‘रुद्र – एज ऑफ डार्कनेस’ येत्या २०२२ मध्ये डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. यात अजयसोबत राशी खन्ना आणि ईशा देओल दिसणार आहेत. हि वेबसिरीज ब्रिटीश सायकोलॉजिकल क्राइम ड्रामा सिरीज ‘ल्युथर’चा हिंदी रिमेक आहे.

२) राज आणि डीकेची सीरीज – राज आणि डीकेची सीरीज ही एक कॉमेडी- थ्रिलर असून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर २०२२ साली रिलीज होणार आहे. यातून शाहिद कपूर OTTवर पदार्पण करणार आहे. यात शाहिद तेलुगू स्टार्स विजय सेतुपती, राशि खन्ना आणि रेजिना कॅसांड्रासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या मालिकेचे शीर्षक आणि तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली

३) फाइंडिंग अनामिका – या सीरिजमध्ये माधुरी एका सुपरस्टारच्या भूमिकेत आहे. ती अचानक गायब होते. करिश्मा कोहली आणि बेजॉय नांबियार यांनी दिग्दर्शित केलेली हि सिरीज २०२२ मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

४) हंसल मेहताचा स्कॅम २००३ – स्कॅम १९९२ नंतर आता सोनी लिव्हवर स्कॅम २००३ २०२२ मध्ये रिलीज होईल. याचे दिग्दर्शनही हंसल मेहता करणार आहेत. ‘स्कॅम २००३ – द क्युरियस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’ ची निर्मिती अॅप्लाज एंटरटेनमेंट करत आहे. त्याची कथा पत्रकार संजय सिंह यांच्या रिपोर्टर्स डायरी या हिंदी पुस्तकातून घेतली आहे.

५) मेडिकल ड्रामा ह्युमन – डिस्ने प्लस हॉटस्टार आता मेडिकल ड्रामा घेऊन येत आहे. यात शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहेत. याचा नुकताच टीझर रिलीज करण्यात आला आहे. यानंतर शोची रिलीज डेट लवकरच जाहीर होईल.

६) कौन बनेगी शिखरवती – Zee5 वर कॉमेडी ड्रामा सीरिज ‘कौन बनेगी शिखरवती?’ २०२२ मध्ये रिलीज होईल. यात नासिरुद्दीन शाह, रघुबीर यादव, लारा दत्ता, सोहा अली खान, कृतिका कामरा, अन्या सिंग, सायरस साहुकर आणि वरुण ठाकूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. कौन बनेगी शिखरवती?’ ७ जानेवारी २०२२ रोजी रिलीज होईल.

७) ये काली काली आंखें – ये काली काली आंखे ही वेबसीरिज १४ जानेवारी २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. या मालिकेत ताहिर राज भसीन आणि श्वेता त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. ही एक थ्रिलर प्रेमकथा आहे. यात ताहिर, श्वेता, आंचल सिंग, सौरभ शुक्ला, ब्रिजेंद्र काला, अरुणोदय सिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

८) बाहुबली- बिफोर द बिगिनिंग – नेटफ्लिक्सच्या या सिरींजची घोषणा २०१८मध्ये मृणाल ठाकूरने केली होती. या मालिकेची कथा आनंद नीलेकेतन यांच्या बाहुबली – बिफोर द बिगिनिंग – राइज ऑफ शिवगामी या पुस्तकाचे स्क्रीन रूपांतर आहे. ही बहुप्रतिक्षित मालिका यंदा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

९) हिरामंडी – बॉलिवूड निर्माता संजय लीला भन्साळी यांची पहिली वेब सिरीज हिरामंडी २०२२ मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकते. माहितीनुसार, या मालिकेची कथा स्वातंत्र्यपूर्व भारतावर आधारित आहे. लाहोरमधील हिरामंडीच्या तवायफची हि कथा आहे.

१०) राणा नायडू – प्रेक्षक २०२२ मध्ये आणखी एका नेटफ्लिक्स वेब सीरिजची वाट पाहत आहेत. राणा नायडू असं याचं नावं आहे. ज्यात तेलुगू सुपरस्टार राणा दग्गुबती आणि त्याचा काका व्यंकटेश पहिल्यांदाच एकत्र दिसतील. हि सिरीज म्हणजे अमेरिकन टीव्ही मालिका रे डोनोव्हनचे रूपांतर आहे. हि कथा श्रीमंत लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या व्यक्तीची आहे.

११) लॉर्ड ऑफ द रिंग्स सीझन १ – द लॉर्ड ऑफ द रिंग्ज सिरीजचा पहिला सीझन २ सप्टेंबर २०२२ रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल. या मालिकेची कथा द हॉबिट आणि द लॉर्ड ऑफ द रिंग्जच्या हजारो वर्षांपूर्वीच्या काळातील आहे.

१२) रॉकेट बॉईज – सोनी लीव्हवर प्रदर्शित होणार्‍या रॉकेट बॉईज या बायोपिकची प्रेक्षक वाट पाहत आहेत. यात जिम सरभ, होमा जे भाभा आणि इश्वाक सिंग हे विक्रम साराभाईच्या भूमिकेत आहेत. याचा टीझर रिलीज झाला आहे.