Take a fresh look at your lifestyle.

‘तुझ्यावर थुंकलचं पाहिजे’..मधली माकडीण; टिकिट टू फिनालेसाठी अभिजित- देवोची एकमेकांवर चिखलफेक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बिग बॉस १५ चा सीजन प्रचंड गाजताना दिसतोय. एकीकडे बिग बॉस १५ चे विजेतेपद आणि दुसरीकडे स्पर्धकांमध्ये रंगलेली विजयाची चुरस. बापरे बाप डोक्याला ताप असं म्हणायची आता वेळ आली आहे. कारण जिंकणे हे एकमेव ध्येय उराशी बाळगून आता जो तो वाट्टेल ते करायला तयार आहे असे दिसत आहे. या सगळ्यात बिग बॉस १५ च्या घरातील दोन स्पर्धकांनी मात्र इतर स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही हैराण केलं आहे. हे दोन स्पर्धक म्हणजे साताऱ्याचे राजकारणी अभिजित बिचुकले आणि मालिकांमधली सोज्वळ सुनबाई देवोलिना भट्टाचार्जी. टिकिट टू फिनालेच्या टास्क मधली ठिणगी घराच्या आत पोचली आणि या दोघांचा पुन्हा एकदा उद्रेक झाला.

कलर्स हिंदीच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता कि, अभिजित बिचुकले आणि देवोलिना भट्टाचार्जी अगदी एकमेकांना मारायलाही तयार होते. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, देवोलिना अभिजीतच्या बेडजवळ जाऊन रागारागाने त्याला बोलते कि तुझ्यावर तर थुंकलचं पाहिजे.. तर यावर अभिजित तिला मधली माकडीण म्हणत अगदी तिच्या अंगावर धावून जाण्यासाठी उठतो तर हातातली बॉटल तिच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात अन्य स्पर्धक उमर रियाझ त्याला आवरण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसतोय. पण इतक्यावरच थांबेल असे थोडीच आहे. जणू अभिजित आणि देवोलिनाचं एक वेगळंच बिग बॉस सुरु आहे.

याआधीही अगदी काहीच दिवसांपूर्वी अभिजित आणि देवोलिनाचा एक विषय अगदी मुद्दा बनला होता. यावर बिग बॉस १५ चा होस्ट अभिनेता सलमान खान याने दोघांनाही चांगलाच सुनावलं होत. देवोलिनाला अंतर ठेवायला शिक सांगत अभिजीतला तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला होता. इतकेच नव्हे तर अगदी गेल्याच विकेंड वारमध्ये अभिजितने सलमानचा चांगलाच रुद्र अवतार पहिला होता. टिकिट टू फिनालेचा टास्क स्पर्धकांनी रद्द केल्यामुळे सलमान आधीच भडकला असताना तो बोलतोय हे पाहूनही अभिजितने जांभई दिली. मग काय? भाईजान भडकला आणि त्याने सरसकट त्याला सुनावले होते.