Take a fresh look at your lifestyle.

BIGG BOSS 15- साथिया तुने क्या किया; विश्वसुंदरीने गायब होऊन बिचूकलेंचा केला पोपट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस १५ च्या घरामध्ये अभिजित बिचूकलेंची दमदार एंट्री झाली आणि मनोरंजनाला एक अलग तडका मिळाला. यानंतर घरामध्ये मनोरंजनाचे वारे वाहू लागले आहेत असे वाटू लागले आहे. या एंट्रीआधी बिचुकले यांनी फार मोठ्या मोठ्या बाता मारल्या होत्या. त्यामुळे आता ते काय करतील आणि काय नाही याचा अंदाज लावणे बऱ्यापैकी प्रेक्षकांसाठी कठीणच आहे. पण आता दिसतंय कि शोमध्ये एंट्री झाल्यानंतर थोडे मनोरंजन आणि थोडा पचका याचे कॉम्बिनेशन म्हणजे अभिजित बिचुकले. त्यांची गाणे गाण्याची कला तर सर्वानाच माहित आहे. पण भांडण्याची कला यातूनच दिसतेय. यानंतर ‘बिग बॉसच्या घरातील विश्वसुंदरीवर प्रेमाचं जाळं फेकण्याचा नादात बिचूकलेंनी स्वतःचा जोक करून घेतला. याचा एक भारी प्रोमो नुकताच कलर्स ने आपल्या अधिकृत इंस्टावर शेअर केला आहे.

त्याच झालं असं कि, अभिजित बिचुकले विश्वसुंदरीला पटवायच्या नादात गाणे गाऊ लागले. साथिया ये तुने क्या किया. पण त्यांना रोमँटिक अंदाज काही विश्वसुंदरीला आवडलेला दिसत नाही. मग काय? विश्वसुंदरी बिचूकलेंचे गाणे ऐकुन गायब झाली ना. एकंदर काय तर बिचूकलेंचा पोपट झाला. कारण बिचूकलेंनि गायलेलं गाणं काही विश्वसुंदरीला आवडलं नाही. शेअर केलेल्या व्हीडीमध्ये आपण पाहू शकता कि अभिजित यांनी विश्वसुंदरीसाठी गाणे गेले आहे. इतकेच काय तर ते विश्वसुंदरीसोबत आणि विश्वसुंदरी अभिजित यांच्यासोबत बोलत आहेत. यानंतर ती अभिजित याना स्तुती करण्यास सांगते. पण त्या बदल्यात अभिजीत जे काही गाणं गटात ते ऐकून विश्वसुंदरी गायबच होते.

साथिया तूने क्या किया. हे गाणे अभिजित विश्वसुंदरीसाठी गटात आणि विश्वसुंदरी स्वतःच गायब होते. आता हे गाणे गायल्यानंतर अभिजित विश्वसुंदरीला सांगतो की, तुम्हाला वाटले तर मी बिग बॉसचा विजेता बनू शकतो. यानंतर अभिजीत हॅलो हॅलो करत राहतो.. आणि विश्वसुंदरी काहीच उत्तर देत नाही. आता काय म्हणायचे यावर… असेच म्हणूया कि बिचूकलेंचा रोमान्स विश्वसुंदरीच्या पचनी पडला नाही. आता हे पाहणे उत्सुकतेचे असेल कि अभिजित बिचुकले आणखी काय काय मनोरंजन करतात आणि खरंच ‘बिग बॉस जिंकतात का? यासाठी पाहत राहा ‘बिग बॉस १५ फक्त कलर्स टिव्हवर.