Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीसाठी मैत्रीचा कस लागणार; उत्कर्षच्या एका निर्णयामुळे जय दुरावणार?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘बिग बॉस मराठीच्या घरात रोज वेगवेगळे भन्नाट टास्क आणि या टास्क दरम्यान होणारी स्पर्धकांमधील चुरशीची लढत दिवसागणिक वाढतच चाललंय आहे. आता हा शो एकीकडे रंगतदार वळणावर पोहोचलेला असताना ५० दिवस पूर्ण झाल्यानंतर मात्र घरातला दोस्ताना कुठेतरी विरताना दिसत आहे. खरतर रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस वाद आणि विवाद यांसाठी जास्त लोकप्रिय आहे. पण हाच शो थोडी दोस्ती, थोडी यारी, थोडी मस्ती, थोडा प्यार आणि एकमेकांचा पलटवार यासाठीही प्रसिद्ध आहे. सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून पहिल्या दिवसापासून उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाने हे दोन्ही स्पर्धक एकमेकांसोबत दिसले आहेत. पण आता उत्कर्षच एक निर्णय यांना चांगलाच भारी पडल्याचे दिसत आहे. यामुळे थेट त्यांच्या मैत्रीवरच गदा आल्याचे पाहायला मिळत आहे.

बिग बॉस घरातील प्रत्येक स्पर्धकांना ज्या पद्धतीचे टास्क देतात त्यानुसार कधी काही कमवायचं तर कधी काही गमवायचं हे तर निश्चितच आहे. यामुळे प्रत्येक टास्क दरम्यान या स्पर्धकांमध्ये मतभेद आणि वाद विवाद विकोपाला जाताना दिसतात. कुणी संयमाने खेळतो तर कुणी संयम सोडून. यामुळे घरात प्रत्येक दिवशी सदस्यांमध्ये जोरदार भांडण आणि राडा होतांना दिसतो. यामध्येच आता बिग बॉस उत्कर्षला एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विशेष अधिकार देताना आपण पाहणार आहोत. ज्यामुळे त्याला सिजनमधील अत्यंत कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. इतकंच नाही तर हाच तो निर्णय ज्यामुळे कदाचित जयसोबतची मैत्री संपुष्टात येईल आणि जयच्या डोळ्यात पाणी दिसेल.

बिग बॉसच्या घरात आज रंगणाऱ्या टास्कमध्ये घरातील सदस्यांमध्ये असणाऱ्या मैत्रीचा कस लागणार आहे. कारण आज विशाल आणि जयमध्ये कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. यात स्पर्धक उत्कर्ष शिंदे याला बिग बॉस एक विशेष अधिकार देतील. ज्यात त्याला कॅप्टन पदाच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी त्याची कोणतीतरी एक गोष्ट गमवावी लागणार आहे. विशेष म्हणजे उत्कर्ष जी गोष्ट निवडणार आहे. त्यामुळे जयच्या डोळ्यात पाणी येणार आहे. दरम्यान, उत्कर्षने असा काय आणि कोणता निर्णय घेतला ज्यामुळे जयच्या डोळ्यात पाणी आलं. इतकंच नाही तर उत्कर्षने नेमकं असं काय गमावलं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण आता या प्रश्नच उत्तर हवं असेल तर यासाठी तुम्हाला आजचा भाग पहावा लागेल.