बिग बॉस मराठी 3 – “वटवाघळाला जग उलटचं दिसतं”; ‘या’ प्रतिस्पर्धकावर उत्कर्षची टोलेबाजी
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन आता अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. यामुळे आता घरातील प्रत्येक सदस्य यारी, दोस्ती सगळं काही विसरून फक्त ट्रॉफी आणि विजयी रकमेकडे पाहताना दिसतोय. प्रत्येकाचे लक्ष बिग बॉस मराठी सीजन ३ चे विजेतेपद आहे. अश्यात आता आपल्याच मित्रांशी पंगे, राडे करताना हे दिसत आहेत. या घरात पहिल्या दिवसापासून उत्तकर्ष शिंदे आणि सोनाली पाटील यांचे नटे काहीसे बरे नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा उत्कर्षने सोनालीवर लगादार टोलेबाजी केली आहे. यावेळी अगदी ”वटवाघळाला जग उलटचं दिसतं” अशा भाषेत उत्कर्षने टिकांचे सत्र लावले आहे.
आता हा सिझन अंतिम टप्प्यावर आला असून प्रत्येक सदस्याचे रूसवे – फुगवे, भांडण, मतभेद, द्वेष काही संपायचे नाव घेत नाहीत. यावेळी घरामध्ये आज सदस्य एकमेकांना आरसा दाखवणार असल्याचा एक टास्क आला. आता कोण कमी कोण जास्त हे राहिलं बाजूला. सगळेच एकमेकांवर वार करू लागेल आहेत. तेही कटू शब्दात. या टास्कमध्ये उत्कर्षने जय आणि सोनालीला आरसा दाखवला. यात सोनालीवर निशाणा साधताना तो म्हणाला कि, मैत्रीण- सखे मी तुला हेच म्हणेन की आपण आरसा पुसत राहतो, आपण चेहरा पुसायचे विसरून जातो. डाग आरशावर नसतात आपल्या स्वत:वर असतात. बर्याच गोष्टी थोडक्यात आता जितक्या कळाल्या आहेत त्या सांगतो मी.
पुढे, सोनाली बर्याचवेळा आपण समोरच्याला ब्लेम करतो, समोरच्याला ऑर्डर देतो, समोरच्याच्या इमोशनशी खेळतो. हे बर्याचदा तुझ्याकडून झालेलं आहे. तु चुकीची आहेस की बरोबर आहेस हे बाहेरच्यांनी सांगण्यापेक्षा तुझ्याच ग्रुपमधल्या, तुझ्या मित्रांनी सांगितलं आहे. का बरं तुझीचं भांडण होतात विशाल – मीनल – विकाससोबत? कारण यामध्ये एक म्हण आहे वटवाघळाला जग उलटचं दिसत. कावीळ झालेल्याला पिवळं दिसतं, हे मी तुला आधीदेखील म्हंटल होतं. यानंतर आता सोनाली शांत राहिली तर ती सोनाली पाटील कसली? पण तिने काय उत्तर दिल हे पाहण्यासाठी आजचा भाग तुम्हाला पाहावा लागेल.