Take a fresh look at your lifestyle.

केजोच्या ‘सेल्फी’मध्ये अक्षय आणि इम्रान करणार फुल्ल धमाल; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता इम्रान हाश्मी पहिल्यांदाच दोघेही एकत्र एकाच चित्रपटात एकच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हि बातमी ऐकून दोघांच्याही चाहत्यांनी आनंद आणि उत्सुकता व्यक्त केली आहे. माहितीनुसार बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर या दोघांसोबत धमाल चित्रपट घेऊन येतोय. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली लवकरच फुल्ल इमोशन, फुल्ल स्टोरी आणि फुल्ल धमाल मनोरंजन असणारा ‘सेल्फी’ हा चित्रपट तयार केला जात आहे. या चित्रपटावर नुकतीच करण जोहर, अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी या तिघांनीही एकत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

आपल्या प्रत्येक चित्रपटातून धम्माल करत चाहत्यांना वेड लावणारा अक्षय तर आपल्या प्रत्येक चित्रपटातून काहीतरी नवीन उत्पत्ती आणणारा इम्रान एकत्र येणार म्हणजे काहीतरी सॉलिड होणार यात काहीच वाद नाही. कारण चाहते नेहमीच या दोघांच्याही हटके स्टाईलला फारच पसंत करतात. त्यामुळे अक्षय आणि इम्रानची ही फ्रेश जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर कल्ला करताना दिसणार आहे. ‘सेल्फी’ या चित्रपटातून ते चाहत्यांचे मनोरंजन करणार आहेत याबाबत माहिती देताना आधी यांनी फक्त एक सेल्फी शेअर केला होता. यानंतर आता अक्षय कुमारने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सेल्फी चित्रपटाची हलकी झलक देत आहे.

अभिनेता अक्षय कुमारने शेअर केलेली हि पोस्ट पाहून चाहते फारच उत्सुक झाले आहेत. कारण ही अक्षय कुमारचा इम्रानसोबतचा हा पहिलाच चित्रपट असून दोघेही आघाडीचे अभिनेते आहेत. यांचा आगामी चित्रपट येणार हि इतकीच बातमी पुरेशी असताना जेव्हा हा व्हिडीओदेखील समोर आला तेव्हा मात्र चाहत्यांच्या उत्सुकतेचा बांध अक्षरशः फुटला आहे. या व्हिडिओसोबत अक्षयने लिहिले आहे कि, लवकरच शूट सुरु होईल. पण आता प्रतीक्षेत असलेले चाहते मात्र घाईवर आहेत. अद्याप इतर कोणतीही माहिती देण्यात आली नसून या चित्रपटातील अन्य कलाकारांची नवे देखील गुलदस्त्यात आहेत.