हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| गेल्या काही दिवसांपासून किरण माने हे नाव फारच चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो मालिकेत विलास पाटील नामक भूमिका ते साकारत होते. त्यांच्या पात्राला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असूनही त्यांना मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आले आणि यावरून वाद निर्माण झाला. यात सामान्य लोकांपासून ते राजकीय नेतेमंडळी आणि कलाकार सगळ्यांनीच प्रतिक्रिया दिल्या. यानंतर अखेर आता शूटिंग व्यवस्थित सुरू असल्याचे समोर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सेटवरील महिला सह कलाकारांनी मोठा खुलासा केला आहे. किरण माने यांची सेटवरील वर्तणूक झाली नव्हती. तसेच महिला कलाकारांना वाटेल ते बोलणे, टाॅन्ट करणे अशा वागणुकीमुळे त्यांना काढून टाकण्यात आले आहे. तेव्हा सेटवरच्या महिला कलाकारांना अशी का वागणूक द्यावी, असा आरोप महिला कलाकारांनी किरण माने यांच्यावर केला आहे.
किरण माने प्रकरणी महिला सहकलाकारांचा मोठा खुलासा
गैरवर्तन केल्याप्रकरणी दाखवली बाहेरची वाट@HelloBollywood4 #kiranmane @StarPravah pic.twitter.com/lSSnOmZ9Ra— Vishakha Mahadik (@Princy_Vishu) January 16, 2022
‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आले. मात्र त्यांनी त्याचा त्यांनी राजकीय स्टंट म्हणून उपयोग करत पोस्ट व्हायरल केल्या आहेत. राजकीय पोस्ट करून दबाव निर्माण करण्याचा किरण माने प्रयत्न करत आहेत. मात्र साताऱ्यातील वाई तालुक्यात गूळुंब या गावात शूटिंग सुरळीत चालू असून शूटिंग बंद करण्यात आल्याच्या निव्वळ अफवा असल्याचे कलाकार सांगत आहेत. किरण माने यांनी ग्रामपंचायतीचे लेटर घेऊन चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलं असल्याचे लाईन प्रोड्युसर सचिन ससाणे यांनी सांगितलं आहे.
सेटवरिल महिलांना अशी वागणूक कश्यासाठी?@StarPravah #Kiranmane pic.twitter.com/PxmqjSyEAg
— Vishakha Mahadik (@Princy_Vishu) January 16, 2022
सविता मालपेकर म्हणाल्या, राजकीय पोस्टमुळे किरण माने यांना काढण्यात आले नाही तर त्यांच्या वागणुकीमुळे काढण्यात आले आहे. त्याला तडफडाकी काढण्यात आले नाही, त्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी शेवटची मिटींग घेवून त्याला फायनली सांगण्यात आले होते की सेटवरून तुझ्याबाबत तक्रार आली तर मालिकेतून काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते. चॅनेलने त्याला काढले नाही, आमचा प्रोड्योक्शनशी आमचा करार झालेला असतो.
श्रावणी पिल्लई म्हणाल्या, आम्ही कामापुरत केवळ बोलतो. आमचा कलाकारांचे नाव घेतले नाही कारण आम्ही तोंड उघडले तर खरे काय ते बाहेर येईल, त्यामुळे कलाकारांवर आरोप केले नसतील. राजकीय पोस्टमुळे चॅनेलने कधीच आक्षेप घेतला नाही.