Take a fresh look at your lifestyle.

..म्हणून, मालिकेतून काढलं; किरण माने प्रकरणी निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेतुन हकालपट्टी करण्यात आली आहे. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच आपल्याला मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर सर्व स्तरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर अखेर याबाबत निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील विलास अप्टिल हि भूमिका करणाऱ्या अभिनेते किरण माने यांना व्यावसायिक कारणांमुळे मालिकेतून काढून टाकलं असे स्पष्टीकरण निर्माते आणि चॅनेलने दिले आहे.

मालिकेतून अचानक काढून टाकल्यानंतर आपल्याला राजकीय भूमिका घेतल्यामुळे काढण्यात आलं असा आरोप मानेंनी केला होता. याबाबत संपूर्ण दिवसभर सर्व स्तरांतून चर्चा सुरु होती. अनेक राजकीय नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. अखेर किरण माने यांना मालिकेतून बाहेर करण्यामागे आपले व्यावसायिक कारणं असल्याचे स्पष्टीकरण निर्मात्यांनी माध्यमांना दिले. यामुळे राजकीय पोस्ट वा राजकीय भूमिका घेतल्यानं माने यांना मालिकेतून काढण्यात आलेलं नाही, असा संदेश जावा, असाही प्रयत्न होत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

 

या दरम्यान, अजूनही चॅनेल किंवा निर्मात्यांनी मात्र नेमकी व्यावसायिक कारण देताना कोणत्या बाबी किरण माने यांच्याबाबत खटकल्या हे अद्याप स्पष्ट सांगितलेलं नाही. मात्र ‘मुलगी झाली हो’ मालिकेत विलास पाटील नामक भूमिका साकारणाऱ्या किरण माने यांची भूमिका अत्यंत लोकप्रिय असूनही त्यांना मालिकेतून बाहेर करण्यात आले याबाबत अजूनही प्रश्न असेच अनुत्तरित आहेत. म्हणून किरण माने यांची मालिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर मराठी कलाकार आणि राजकीय भूमिका हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.