Take a fresh look at your lifestyle.

‘सिंगल’च्या माध्यमातून अभिनय आणि प्रथमेश पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी इंडस्ट्रीतील युवा अभिनेते म्हणून ओळख असलेला अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेता प्रथमेश परब या दोघांचाही स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. या दोघांनीही आतापर्यंत विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यानंतर आता पहिल्यांदाच ते एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. एकत्र कधीही काम न केलेली ही तरुण कलाकारांची जोडगोळी प्रेक्षकांसाठी हटके आणि भारी कॉमेडी घेऊन येत आहेत. या दोघांच्या जोडीला घेऊन ‘सिंगल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

नुकतेच ‘सिंगल’ या चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन आणि क्लॅप पूजन झाले आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे पूजन पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुणे येथे गणपती मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण करून करण्यात आलं. यावेळी मराठी अभिनेता अभिनय बेर्डे, प्रथमेश परब यांच्यासह दिग्दर्शक चेतन चवडा, निर्माते किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे, गौरी सागर पाठक आणि सह-निर्माते सुमित कदम उपस्थित होते. तसेच संतोष शर्मा, शीतल ढेकळे, रितेश ठक्कर, सुहास गायकवाड हेदेखील याठिकाणी उपस्थित होते. माहितीनुसार प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे ‘सिंगल’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. तर इतर कलाकारांची नावे अजून समोर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinay L Berde (@abhinay3)

सिंगल या चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन चवडा यांनी सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट कॉमेडी जॉनरचा आहे. या चित्रपटाची कथा ही महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या जीवनावर आधारलेली आहे. आताची तरुण पिढी आणि त्यांचे विश्व त्यात त्यांची धमाल मस्ती या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे या हा चित्रपट तरुण प्रेक्षक ओढणार एव्हढं नक्की. चित्रपट निर्माते किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे, गौरी सागर पाठक आणि सह-निर्माते सुमित कदम निर्मित असून सिंगलच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी हास्यकल्लोळ सादर करण्यास ते सज्ज झाले आहेत. चित्रपटाच्या स्क्रिप्ट पूजन आणि क्लॅप पूजन सोहळ्याला हा चित्रपट लवकरच चित्रीकरणास जाणार असल्याचे सांगितले आहे.