Take a fresh look at your lifestyle.

भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्या विश्वचषकाची विजयगाथा ’83’ चा टीझर प्रदर्शित; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या भारतीय क्रिकेट संघाने २५ जून १९८३ रोजी लंडन येथे लॉर्ड्स मैदानावर पहिला विश्वचषक जिंकला होता. हि एक अशी विजय गाथा आहे जी कुणीच विसरू शकत नाही. याच कथेवर आधारित ‘८३’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी वेगळीच उत्सुकता आहे. या टीझरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर झाली आहे. यात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

रणवीरने आपल्या इंस्टावर ’83’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. अगदी ५९ सेकंदाच्या टीझरमध्ये १९८३ साली लंडनमधील लॉर्ड्स मैदानात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चा सामना दाखवण्यात आला आहे. हा सामना पाहण्यासाठी जमलेले चाहते त्यांचा उत्साह यात दाखवला आहे. हा चित्रपट अनेकांसाठी एक स्फूर्ती आहे. सध्या सोशल मीडियावर या टीझरने कमाल केली आहे. रणवीरने टीझर शेअर करत, ही आतापर्यंतची सर्वांत चांगली कथा आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडा या भाषांमध्ये रिलीज होणार असल्याचे कॅप्शन दिले आहे.

हा चित्रपट याआधी ४ जून २०२१ रोजी रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. ’83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्र दिग्दर्शक कबीर खान यांनी जबाबदारीनिशी सांभाळली आहेत. तर चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी या भूमिकेत दिसणार आहे. तर एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार टीम इंडिया मधील खेळाडूंच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.