Take a fresh look at your lifestyle.

भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग करणार सिनेसृष्टीत एन्ट्री; चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल अनेको स्टार किड्स एकामागोमाग एक सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. यातील काहींचे करिअर झाले. तर काहींना मात्र परत फिरून काढता पाय घ्यावा लागला आहे. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघातील क्रिकेटपटू हरभजन सिंग आता क्रिकेट क्षेत्रात भल्याभल्यांच्या दांड्या गुल्ल केल्यानंतर लवकरच सिनेसृष्टीतील अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे. विश्वास बसत नसला तरीही हेच खरे आहे. नुकतेच त्याच्या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर निर्मात्यांकडून शेअर करण्यात आले आहे.

‘फ्रेंडशिप’ या नव्याकोऱ्या चित्रपटातून क्रिकेट चाहत्यांचा लाडका भज्जी अर्थात हरभजन सिंग अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर देखील शेअर करण्यात आला होता. यानंतर आता या चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. निर्मात्यांनी सिंग आणि त्याच्या मित्रांसोबतचे हटके आणि युनिक अवतारातील एक आकर्षक पोस्टर आणि त्याचसोबत एक लिरिकल व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करून या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.

क्रिकेटपटू हरभजन सिंग याने त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘फ्रेंडशिप’ या आगामी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आपण पदार्पण करत असल्याची घोषणा केली. ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पॉल राज आणि सूर्या हे दोघेही करत आहेत. यामध्ये अर्जुन आणि तमिळ ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लोसलिया मारियानेसन हे एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी ७ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीवश अनेक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती त्यांपैकीच हा एक चित्रपट आहे.