Take a fresh look at your lifestyle.

रिया चक्रवर्ती खोटारडी ; व्हिडिओ शेअर करून क्रिकेटपटूने केला खुलासा

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलीवूडचा अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या तपासाबाबत एक मोठा धक्कादायक खुलासा भारताच्या क्रिकेटपटूने केला आहे. भारताचा क्रिकेटपटूने मनोज तिवारी याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ पाहून सर्वांच्या लक्षात येईल की सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही खोटं बोलत असल्याचे सिद्ध झालं आहे.

रियाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ” मी आणि सुशांत आम्ही दोघं युरोपच्या ट्रिपला गेलो होता. पॅरिसमध्ये असताना सुशांत आपल्याला लोकं ओळखतील म्हणून तीन दिवस घराबाहेर पडला नव्हता. सर्वात आधी या ट्रिपमध्ये आम्ही पॅरिसला गेलो होतो. तिथे आपल्याला कोणी ओळखणार नाही आणि आपल्याला धमाल करता येईल, असे सुशांत मला म्हणाला होता. पण पॅरिसला गेल्या सुशांत तीन दिवस आपल्या रुमच्या बाहेरच पडला नव्हता. सुशांतला नेमके काय झाले होते, हे मला कळत नव्हते.”

रियाने आपल्या मुलाखतीमध्ये सुशांत पॅरिसमध्ये आपल्या घराबाहेर पडला नव्हता, असे म्हटले होते. पण रियाचे हे म्हणणे किती खोटे आहे, हे भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने दाखवून दिले आहे. पॅरिसमध्ये असताना सुशांत घराबाहेर पडला होता आणि त्याने येथील डिस्नीलँडला गेला होता, असे मनोजने म्हटले आहे. सुशांत जेव्हा फिरायला गेला होता त्याचा व्हिडीओच मनोजने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामुळे रिया सुशांतबाबत किती खोटं बोलते, हे आता समोर आले आहे.

सुशांतचा व्हिडीओ पोस्ट केल्यावर मनोज म्हणाला की, ” रिया म्हणते की पॅरिसला गेल्यावर सुशांत आपल्या घरातून तीन दिवस बाहेरच पडला नव्हता. पण रिया खोटं बोलत आहे. कारण पॅरिसमध्ये डिस्नीलँड येथे सुशांत फिरायला गेला होता, हा घ्या पुरावा…”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’