हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । सर्वात मोठा सिंगिंग रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जाणारा इंडियन आयडल सीझन 13 (Indian Idol 13) सध्या वादात आहे. या शोबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अरुणाचल प्रदेशातील गायक-संगीतकार रिटो रिबा यांना शॉ मध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने नेटकरी शोवर जोरदार टीका करत आहेत. आता एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत इंडियन आयडॉल सिझन १३ ची पोलखोल केली आहे. इंडियन आयडॉलसारख्या मोठ्या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये निवड होण्यासाठी काय करावे लागते? हे सांगत सदर व्यक्तीने इंडियन आयडॉल शोचा पर्दाफाश केला आहे.
व्हिडिओ होतोय व्हायरल (Indian Idol 13) –
इंस्टाग्रामवर जेम्स लिबांग नावाच्या व्यक्तीने इंडियन आयडॉल रिअॅलिटी शोच्या विरोधात एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जेम्स शोमध्ये गाण्याचे ऑडिशन देताना दिसत आहे. आधी तो रिटो-रिबाच्या आवाजात गाणे गाऊन परफॉर्म करतो, त्यानंतर शोचे जज त्याला निवडत नाहीत. त्यानंतर, रिटो आपण अतिशय गरिबीत आल्याचं सांगत जजना इमोशनल करतो. त्यानंतर अतिशय वाईट आवाजात गाणे म्हणून देखील त्याची निवड करण्यात येते. सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
रिटो रिबाच्या समर्थनार्थ व्हिडीओ
खरे सांगायचे झाले तर, जेम्सचा हा व्हिडिओ एडिट करण्यात आला असून इंडियन आयडॉल शोला विनोदी पद्धतीने ट्रोल करण्याच्या उद्देशाने तो बनवण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरने गायक रिटो रिबाला पाठिंबा दिला आहे. हिमेश रेशमिया, नेहा कक्कर आणि विशाल ददलानी यांनी रिटो रिबाला टॉप 15 मध्ये कसे निवडले नाही हे देखील व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. (Indian Idol 13)
इंडियन आयडॉलवर बहिष्कार टाकणारे लोक
ट्विटरवरही यूजर्स इंडियन आयडॉलच्या विरोधात गोंधळ घालत आहेत. रिटो गिबाने इंडियन आयडॉलमध्ये जबरदस्त ऑडिशन दिले, तरीही शोचे न्यायाधीश हिमेश रेशमिया, नेहा कक्कर आणि विशाल ददलानी यांनी रिटो रिबाला टॉप 15 मध्ये निवडले नाही. यामुळे सोशल मीडियावर चाहते रिटोसाठी आवाज उठवत आहेत. काही युजर्सनी या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली आहे.
Discussion about this post