Take a fresh look at your lifestyle.

‘Indian Idol मराठी’ची सूत्रसंचालक बदलणार?; स्वानंदी नव्हे तर प्राजक्ता मंच गाजवणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहेत. हिंदीनंतर पहिल्यांदाच मराठीमध्ये हा सिंगिंग रिऍलिटी शो सुरू झाला आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकही या शोला भरभरून प्रेम आणि पसंती देत आहेत. याशिवाय मराठी इंडियन आयडॉल च्या परीक्षक पदावर सुप्रसिद्ध गायक-संगीतकार – गीतकार जोडी अजय अतुल विराजमान झाले आहेत. त्यामुळे शोला आधीच चार चांद लागले आहेत. तर शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकर करताना दिसत होती. तिची शैली लोकांना आवडत असताना आता मध्येच ती सूत्रसंचालन सोडणार असल्याची बातमी समोर येत आहे. यानंतर सूत्रसंचालनाची सूत्र प्राजक्ता माली सांभाळणार असल्याची माहिती मिळत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकर गेल्या अनेक दिवसांपासून इंडियन आयडॉल मराठीची सूत्रे उत्तमरीत्या हाताळत होती. यानंतर आता ती सूत्रसंचालन करणार नाही हे ऐकून सगळ्यांनाच धक्का लागला आहे. तर तिच्या चात्यानी नाराजी दर्शविली आहे. यानंतर मात्र सूत्रसंचालनाची सूत्र अभिनेत्री प्राजक्ता माळी सांभाळणार आहे अशी माहिती मिळत आहे. मात्र अद्याप स्वानंदी या शोचे सूत्रसंचालन करणार नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तूर्तास या फक्त चर्चा आहेत असेच म्हणावे लागेल.

अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकर ही एक मराठी अभिनेत्री आहे. ती अभिनेते उदय टिकेकर व गायिका आरती अंकलीकर यांची कन्या आहेत. तिने आय. एल. एस. महाविद्यालयातून विधी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. यानंतर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील मीनल व दिल दोस्ती दोबारा या मालिकेतील मुक्ता या नावाने तिने अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

तर अभिनेत्री प्राजक्ता माळी हि एक उत्तम, अभिनेत्री, डान्सर, सूत्रसंचालक तसेच कवयित्री देखील आहे. तिच्या अभिनयाने ती सगळ्यांना भुरळ घालत असतेच. याशिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या सूत्रसंचालनाची सूत्रे ती तिच्या खुमासदार शैलीत सांभाळताना दिसते.