Take a fresh look at your lifestyle.

स्टोरीटेलच्या खजिन्यात नाटककार अभिराम भडकमकर लिखित ‘इन्शाअल्लाह’ कादंबरीचा समावेश

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटककार, कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अत्यंत नावाजलेली आणि महत्वपूर्ण घटकांचा समावेश असलेली ‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी नुकतीच स्टोरीटेलवर प्रकाशित झाली आहे. बागवानी बोली असणारी हि कादंबरी श्रोतेमंडळींसाठी एक पर्वणी आहे. आजचा मुस्लीम मोहल्ला कसा आहे..? आजच्या मुस्लीम तरुणांपुढे कोणते प्रश्न उभे ठाकले आहेत…? त्यांच्या जगण्यातील वास्तव आणि जगण्याबाबत उत्पन्न झालेली अस्वस्थता याचं या कादंबरीत विशिष्ट पद्धतीने रेखाटन केलं आहे. कादंबरीकार अभिराम भडकमकर यांच्या ‘असा बालगंधर्व’ आणि ‘अॅट एनी कॉस्ट’ या दोन कादंबऱ्यांनंतर ‘इन्शाअल्लाह’ ही त्यांची तिसरी कादंबरी आहे. नाटककार अभिराम भडकमकरलिखित ‘इन्शाअल्लाह’ त्यांच्याच आवाजात, स्टोरीटेल मराठीवर प्रदर्शित झाली असून या कादंबरीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

कादंबरीकार अभिराम भडकमकर लिखित इन्शाअल्लाह कोल्हापुरातील एका मोहल्ल्यातून सुरु होते. जिथून जुनैद हा अगदी विशीचा असा तरुण गायब होतो. पुढे जुनैदसह त्याच भागातील आणखी एक तरुण आणि बाहेरून आलेला तिसरा तरुण असे तिघेही गायब होतात. काही दिवसांनी जुनैद व्यतिरिक्त इतर दोघ सापडतात पण जुनैदचं सापडत नाही. दरम्यान कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पोलीस उधळून लावतात आणि या अयशस्वी कटात जुनैदचा सहभाग असल्याच्या संशयावरून ते त्याचा शोध घेऊ लागतात. पण तरीही तो सापडत नाही. यामुळे त्याची आई दुःखी होते. जुनैदला शोधू लागते. दरम्यान तिच्या भावना, आक्रोश आणि तडफड या सगळ्याला समांतर असणारा तिच्या मोहल्ल्याचा एक मोठा प्रवास आणि मोहोल्ल्याची संस्कृती या कादंबरीत उलघडली आहे. आता जुनैदचं नेमकं काय होत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्टोरीटेलची मदत घ्यावी लागेल.

अभिराम भडकमकर हे मुळात नाटककार आहेत. त्यामुळे दृश्यमयता हे त्यांच्या लेखन शैलीचे मुख्य असे बलस्थान म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कादंबरीतील प्रत्येक घटना डोळ्यासमोर कल्पनेतील विश्वाप्रमाणे उघड दिसते. प्रत्येक घटना एकामागे एक धाव घेतात मात्र कादंबरीतील वीण कायमराहते . कुठेही तुटक किंवा गाठ पडलेली वाटत नाही. पुढे या घटनांचा पट वेगाने सरकतो आणि पुढे काय होईल हे जाणून घेताना धडधड वाढू लागते. लेखकाने त्याच्या कल्पनेत रंगवलेला मोहल्ला वाचक आणि श्रोता स्वतः देखील अनुभवतो हीच भडकमकर यांच्या लेखणीची ताकद आहे.