Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता सोनू सूदच्या नावाने ॲम्बुलन्स सेवा सुरु ; अशा प्रकारे करणार लोकांची मदत

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने लॉक डाउन दरम्यान देशभरातील अनेक लोकांना मदत केली होती. कष्टकरी मजुरांच्या आणि बिकट परिस्थिती असलेल्या गरिबांसाठी सोनू सूद धावला होता. सोनू सूदच्या या दमदार कामगिरीमुळे तो देवदूत म्हणून देखील ओळखला जाऊ लागला. चित्रपट सृष्टीत खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र सर्वांसाठी नायक ठरला. सोनूच्या या दानशूर पणाचे कौतुक संपुर्ण देशभर झाले.

नुकतंच सोनूने केलेल्या चांगल्या कामाने प्रेरित होऊन हैदराबादमधील एका व्यक्तीने अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिस सुरू केली आहे. त्या व्यक्तीने सोनू सूदच्या नावानेच ही सेवा सुरू केली आहे. शिवा असं अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिस सुरू करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. शिवा व्यवसायाने एक जलतरणपटू आहे. त्याने 100 हून अधिक लोकांना तलावात उडी मारून जीवन संपवणाऱ्यांना वाचवलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये तो अतिशय चर्चेत आहे.

त्याच्या या चांगल्या कामामुळे त्याला डोनेशनही मिळू लागलं. शिवाने सुरू केलेल्या अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिसचं नाव ‘सोनू सूद अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिस’ असं ठेवलं आहे. याचं उद्धाटनही स्वत: सोनूने केलं आहे. शिवाच्या या कामासाठी सोनूने त्याचं कौतुक केलं असून, त्याला अशाप्रकारे चांगलं काम सुरू ठेवण्याचं सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.