हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूडचा ख्यातनाम दिगदर्शक म्हणून ओळख असलेला अनुराग कश्यप हा सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्याने नुकतेच अभय देओल स्टार होण्याचा फायदा घेत असल्याचा आरोप केला होता. यावर आता अभय देओल ने इंस्टाग्राम वर पोस्ट लिहून खुलासा केला आहे. नेहमी स्पष्टपणे सोशल मीडियावर आपली मते मांडणाऱ्या अनुराग ने ‘देव डी’ सिनेमात अभय देओल सोबत काम करतानाचा स्वतःचा अनुभव सांगताना हे विधान केले होते. त्याने या खुलाशामध्ये मी भाग्यवान होतो म्हणून मला अनुराग कश्यप हा दिगदर्शक मिळाला असाही उल्लेख केला आहे.
‘२००९ मध्ये रिलीज झालेल्या “देव.डी” सिनेमाचा अनुराग दिगदर्शक होण्यापूर्वी मी अनेक लोकांना ही कल्पना सांगत एक वर्ष घालवला होता. हा सिनेमा नेहमीच एक आर्ट सिनेमा होता. मी आधी यासंदर्भातील पुस्तक वाचले होते आणि मला हे समजले होते की यातील पात्र एक अराजकवादी, चुकीचे, गर्विष्ठ आहे. दुसरीकडे स्त्रिया बळकट आणि एकनिष्ठ राहिल्या होत्या. मला ते बदलायचे होते. मला त्यांना सक्षम दाखवायचे होते. त्यांना स्वतंत्र आणि बळकट दाखवायचे होते. त्यांची ओळख त्या प्रेम करणाऱ्या पुरुषांवरून किंवा कोणत्याही पुरुषांवरूनही दाखवायची नव्हती.’ स्त्री पात्रावरून आमच्यात थोडेफार मतभेद झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्यानंतर त्याने चित्रपटातील एका महिला पात्रावरुन त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले. अनुरागला चित्रपटाचा शेवट हा आनंदी हवा होता त्यामुळे त्यांच्यामध्ये मत भेद झाले होते. तसेच चित्रपटाच्या एडिटींगवरुनही वाद झाल्याचे म्हटले आहे.यापूर्वी अनुरागने एका मुलाखतीमध्ये अभय देओलसोबत काम करणे माझ्यासाठी कठिण असल्याचे म्हटले होते. तसेच तो देओल असण्याचा फायदा घेतो असे अनुराग म्हणाला होता. ‘त्याच्या सोबत काम करतानाच्या चांगल्या आठवणी नाहीत असे म्हटले होते. त्याला आर्टिस्टिक चित्रपटांमध्ये काम ही करायचे आहे आणि मेनस्ट्रीमचे फायदेही हवे आहेत. तो देओल असल्याचा फायदा घेता. चित्रपटाचे बजेट कमी असूनही तो फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होता. त्यामुळे त्याच्यासोबत काम करणारे दिग्दर्शक त्याच्यापासून थोडे लांब होते. तो खूप चांगला अभिनेता आहे’ असे अनुराग म्हणाला होता.